महाराष्ट्रातील ‘या’ शहरात आढळतोय कोरोनाचा नवा स्टेन; ‘ही’ आहेत लक्षणे

नवी लक्षणे आढळून येत असलेल्या रुग्णांच्या नाकात, डोळ्याला इजा होत आहे. इतकेच नाही तर यामुळे अनेक रुग्ण दगावतही आहेत. तसेच रुग्णांचे डोळे निकामी होण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. हा नवा स्ट्रेन भारतातीलच असल्याचा दावाही तज्ज्ञ डॉक्टर्स करत आहेत.

    नाशिक: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण मोठा ताण निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स उपलब्ध होत नसतानाच आता नाशिकमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन नाशिकमध्ये आला आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

    नाशिकमधील कोरोना बाधित आणि डायबेटिस असलेल्या रुग्णांमध्ये ही नवी लक्षणे आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    नवी लक्षणे आढळून येत असलेल्या रुग्णांच्या नाकात, डोळ्याला इजा होत आहे. इतकेच नाही तर यामुळे अनेक रुग्ण दगावतही आहेत. तसेच रुग्णांचे डोळे निकामी होण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. हा नवा स्ट्रेन भारतातीलच असल्याचा दावाही तज्ज्ञ डॉक्टर्स करत आहेत. कोरोना बाधित रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या या नव्या लक्षणांमुळे आता डोकेदुखी आणखी वाढली आहे.

    ३० एप्रिलच्या आकडेवारीनुसार, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १८२० नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले होते. २७६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर त्याचवेळी २४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या नाशिकमध्ये एकूण २२,४७४ सक्रिय रुग्ण आहेत.