आगामी 15 दिवसांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. आता हे मंदिर 18 एप्रिलपर्यंत बंद राहील अशी माहिती मंदिर विश्वस्त समितीने दिली. याबात रविवारी विश्वस्त समितीची चर्चा झाली.
नाशिक : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहू जाता अनेक मंदिर प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. नाशिकमध्येही कोरोनाने थैमान घातले असून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातही आता निर्बंध लादण्यात आले आहेत.
आगामी 15 दिवसांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. आता हे मंदिर 18 एप्रिलपर्यंत बंद राहील अशी माहिती मंदिर विश्वस्त समितीने दिली. याबात रविवारी विश्वस्त समितीची चर्चा झाली.
मदिरातील अेनक कर्मचाऱ्यांना कोरोनाबाधा झाल्याची पुष्टी झाल्यानंतर बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरांनी निर्बंध लागू केले आहेत.