जलकुंभावर चढून नगरसेविकेचे आंदोलन; पाणीप्रश्न महासभेत गाेंधळ

सिडकोतील नगरसेविका किरण गामणे व सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून मनपा व महापौरांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले

 

नाशिक : सिडको परिसरासह पाथर्डी फाटा उत्तम नगर पवननगर या परिसरात अनेक दिवसांपासून वेळी-अवेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून सिडकोतील नगरसेविका किरण गामणे व सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून मनपा व महापौरांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. प्रभागात पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी करून देखील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे लक्ष देत नाहीत असा आरोप नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे केल्यानंतर नगरसेविका किरण गामणे यांच्यासह नागरिकांनी पाथर्डी फाटा येथील जलकुंभ आवर चढून निषेध नोंदवत आंदोलन केले.

महापाैरांविरुद्ध घाेषणा
शिवसेना नगरसेविका किरण गामने यांनी चक्क ऑनलाइन महासभेत सहभाग नोंदवत आपल्या प्रभागातील पाणी सत्ताधारी पक्षाचे महापौर हे स्वतःच्या प्रभागात पळवत असल्याचा आरोप यावेळी नगरसेविकेने केला तसेच सिडको वासियांचे पाणी पळवणार्‍या महापौरांचा निषेध असो, भाजप महापौर हाय हाय अशा घोषणा देत निषेध केला.

गेली दहा ते पंधरा दिवसापासून प्रभागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून मनपा मध्ये अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत काही अधिकाऱ्यांकडून अशी कुणकुण येते आहे की महापौर अधिकाऱ्यांवर दबाव आणतात. जास्त पाणी सोडू नये असे सांगण्यात येत आहे.यामुळे सिडको वाशीयांवर अन्याय होत असून अशा महापौरांचा मी निषेध करते- किरण गामने दराडे , नगरसेविका