आयुक्तांच्या काैतुक करताच वाढली गुन्हेगारी! ; गाेदाघाटावर चायनीजच्या गाड्या जाळल्या

अनिता जीवन राऊत (३९, रा. एकता नगर, बाेरगड, म्हसरूळ) यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राऊत या गुरूवारी आपली चायनीजची गाडी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बंद करून गेल्या. रात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात टवाळखाेरांनी सागर कुंवर, रमेश शिरपाली अशा तिघांच्या चायनीज गाड्या जाळून टाकल्या. या गटनेची मािहती मिळताच पंचवटी आणि सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले

    पंचवटी : दाेन दिवसांपूर्वी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त दीपक पाण्डे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन काैतुक केले हाेते. मात्र त्यांची पाठ फिरताच पंचवटी परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढल्याने पंचवटी पोलीस ठाण्याला गुन्हेगारांची ‘नजर’ लागली की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

    गाेदाकाठावर असलेल्या बाेटींना आग लावण्याचा प्रकार ताजा असतानाच समाजकंटकांनी गोदावरी तीरावरील खंडेराव मंदिर परिसरातील तीन चायनीज गाड्या आणि खुर्च्या जाळल्या. बाेट जाळल्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच समाजकंटकांनी हे नवे कृत्य करून पंचवटी पाेलिसांना आव्हान दिले आहे.

    याप्रकरणी अनिता जीवन राऊत (३९, रा. एकता नगर, बाेरगड, म्हसरूळ) यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राऊत या गुरूवारी आपली चायनीजची गाडी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बंद करून गेल्या. रात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात टवाळखाेरांनी सागर कुंवर, रमेश शिरपाली अशा तिघांच्या चायनीज गाड्या जाळून टाकल्या. या गटनेची मािहती मिळताच पंचवटी आणि सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले