दशक्रिया विधीसाठी गर्दी केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा

शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये ,लॉन्स व गर्दीचे ठिकाणावर गर्दी न करण्याचे निर्देश असतांना काही लोक नियमांचे उल्लंघन करताना दिसत असल्याने गुन्हे दाखल करून इतरांना सतर्क करण्याचे काम पोलीस पथक करीत असल्याचे सहा.पोलीस निरिक्षक दिपक पाटील यांनी सांगितले. घटनेत इगतपुरी पोलीस पथक तपास करीत असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे अहवान सहा.पोलीस निरिक्षक शरद सोनवणे यांनी केले.

    इगतपुरी : काेराेनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने याकरीता काही नियम ठरवून दिले आहेत. इगतपुरी तालुक्यात दशक्रिया विधीच्यावेळी या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी टाके घाेटी परिसरात दाेन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

    शनिवार दि. २० रोजी सकाळी १०-३० वाजता टाकेघोटी येथे स्मशानभूमीजवळ दशकि्रया विधीचा कार्यक्रमास सुमारे तीनशे ते चारशे लोकांची गर्दी झाली हाेती. यावेळी काेराेना नियमांचे उल्लंघन झाल्याने फिर्यादी पोलीस हवालदार राजेंद्र चिंतामण चौधरी यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद नोंदविली. सबंधितांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली अाहे.