नाताळच्या खरेदीसाठी गर्दी : चाॅकलेट, केक, ख्रिसमस ट्री बाजारात दाखल

नाशिक : शहर परिसरात नाताळाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सण साजरा करण्यासाठी सांताक्‍लॉज आणि चॉकलेटचे केक आदी वस्तूंची दुकाने बाजारात सजली आहेत. तसेच ख्रिसमस ट्री, स्टार, बेल, मास्क, कपडे, टोप्या या वस्तूंनी बाजारपेठ फुलली आहे.

नाशिक : शहर परिसरात नाताळाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सण साजरा करण्यासाठी सांताक्‍लॉज आणि चॉकलेटचे केक आदी वस्तूंची दुकाने बाजारात सजली आहेत. तसेच ख्रिसमस ट्री, स्टार, बेल, मास्क, कपडे, टोप्या या वस्तूंनी बाजारपेठ फुलली आहे.

सांताक्लाॅजची मदत
काेरानेाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करण्याचे नियोजन करत आहे. यासाठी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या बालगाेपाळांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांकडून सांताक्‍लॉजची मदतही घेतली जात असल्याचे चित्र दिसते आहे.

आकर्षक केक बाजारात
आनंदाने, उत्साहात नाताळ साजरा केला जाताे. या काळात केकला विशेष महत्त्व आहे. वेगवेगळ्या डिझाईनचे केक बाजारात दाखल झाले आहेत. केकवर सांताक्लाॅज, ख्रिसमस ट्री आदींची चित्रे काढून केक आकर्षक करण्यात आला आहे.

राेषणाईच्या वस्तू बाजारात
या दिवसांत प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांताक्‍लॉज दिसून येतो. विविध रंगांनी, डिझाईन केलेले केक बनवण्यात येतात. यात सांताची अनेक रूपे पाहायला मिळतात. काही केकविक्रेत्यांकडे नाताळासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. घराच्या राेषणाईसाठी लागणाऱ्या माळा, राेषणाई करणारे दिवे, मेरी खि्रसमस स्टीकरही बाजारात उपलब्ध अाहेत. चॉकलेटच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. दुकानांमध्ये विविध स्वादांच्या विविध रंगरूपांतील चॉकलेटने खरेदीदारांना भुरळ घातली आहे. विविध आकाराच्या खोक्‍यांमध्ये कागदी किंवा कापडी आवरणात बांधून हे चॉकलेट दिले जात आहेत.