dadaji bhuse son marriage

भुसे यांचे चिरंजीव अविष्कार व खासदार राजन विचारे(Bhuse and vichare marriage) यांची कन्या लतिशा यांचा आज मालेगाव येथे विवाह सोहळा अवघ्या २५ पेक्षाही कमी नातलगांच्या उपस्थितीत पार पडला.

    नाशिक : काेराेेना काळात माेठ्या लग्नाची हाैस करणाऱ्यांसाठी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी आपल्या मुलाचा विवाह एक आदर्श(ideal marriage) म्हणून ठेवला आहे. भुसे यांचे चिरंजीव अविष्कार व खासदार राजन विचारे यांची कन्या लतिशा यांचा आज मालेगाव येथे विवाह सोहळा अवघ्या २५ पेक्षाही कमी नातलगांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचे मंत्री आणि तालुक्यातील वजनदार नेते असतानाही कुठलाही बडेजाव न करता परिस्थितीचे भान राखून भुसे यांनी हा विवाह साेहळा पार पाडल्याने त्यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.

    पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विवाहास फेसबुक लाईव्ह माध्यमातून हजेरी लावत नवदाम्पत्यास शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

    मनमाड चौफुली येथील आनंद फार्म येथे मोजक्या वऱ्हाडीच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला आलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. संपूर्ण विवाहसोहळा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेकांनी लाईक्स कमेंटससह शुभेच्छापर संदेश देत यावेळी नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.

    राज्याच्या कॅबिनेट मंत्री असलेल्या नेत्याच्या मुलाचे लग्न घरातल्याच मंडळीमध्ये पार पडल्यामुळे कौतुक होत आहे. कोविड काळात सर्व नियम पाळत हा विवाहसोहळा पार पाडण्यात आला. मुलाचे मामा, काका मावशी, आत्या, मामा याव्यतिरिक्त कोणीही या सोहळ्याला उपस्थित नसल्याची माहिती बंडूकाका बच्छाव यांनी यांनी दिली.