अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदगाव तालुक्याला कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली भेट, शेतकऱ्यांशी साधला संवाद

अतिवृष्टीचा(Heavy Rain) फटका बसून शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या नांदगाव(Nandgaon) तालुक्यतील वेगवेगळ्या भागाला राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे(Dadaji Bhuse In Nandgaon) यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

    अतिवृष्टीचा(Heavy Rain) फटका बसून शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या नांदगाव(Nandgaon) तालुक्यतील वेगवेगळ्या भागाला राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे(Dadaji Bhuse In Nandgaon) यांनी आज भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत आमदार सुहास कांदे आणि विविध विभागाचे अधिकारी देखील होते.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

    यावेळी अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केल्यानंतर कृषिमंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. भुसे अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, “मी स्पष्ट करतो…तुम्ही आता सरळ नीट रहा…जर शेतकऱ्यांच्या भावना अति तीव्र झाल्या तर मग तुम्हाला पळता भुई थोडी होईल.आज शेतकरी अडचणीत आहे.गांभीर्याने घ्या.” तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरात लवकर नुकसानभरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.

    मुसळधार पावसामुळे पिकांसोबत शेती वाहून गेल्यामुळे हवालदिल होऊन आत्महत्या केलेल्या मंदाबाई यांच्या निवासस्थानी जाऊन भुसे यांनी मंदाबाईच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊन टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन भुसे यांनी केले.