प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सिडकोतील बाळासाहेब कोळे या रुग्णांचा उपचारादरम्यान मुत्यू झाल्याची महिती बिटको कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली. हा रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तेव्हा त्याची परिस्थिती गंभीर होती. त्याला व्हेटिलेटर घेतले होते. गुरुवारी रात्री १२.१५ वाजेदरम्यान त्याचा मुत्यू झाला. दोन पैकी एक रुग्ण आपल्याकडे दाखल असल्याचे डॉ. धनेशवर यांनी सांगितले. सध्या बिटको रुग्णालयात ६६१ रुग्ण उपचार घेत आहे.

    नाशिकरोड : कोरोनाची लागण असलेल्या सिडको परिसरातील दोन रुग्णांनी मनपा कार्यालयाबाहेर आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यांना बिटको कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बाळासाहेब काेळे यांचा मुत्यू झाला. त्यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. कोरोना लागण झाली म्हणून सिडको परिसरातील दोन रुग्णांनी मनपा कार्यालय राजीव गांधी भवन गेटबाहेर बुधवारी सायंकाळी ऑक्सिजन लावलेले असताना दोघांनी आंदोलन केले.

    या प्रकाराने मनपा कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली आणि त्यांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सिडकोतील बाळासाहेब कोळे या रुग्णांचा उपचारादरम्यान मुत्यू झाल्याची महिती बिटको कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली. हा रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तेव्हा त्याची परिस्थिती गंभीर होती. त्याला व्हेटिलेटर घेतले होते. गुरुवारी रात्री १२.१५ वाजेदरम्यान त्याचा मुत्यू झाला. दोन पैकी एक रुग्ण आपल्याकडे दाखल असल्याचे डॉ. धनेशवर यांनी सांगितले. सध्या बिटको रुग्णालयात ६६१ रुग्ण उपचार घेत आहे.