swapnil shinde death in nashik

नाशिकमध्ये डॉ स्वप्नील शिंदे (Swapnil Shinde Death Case) या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. डॉ स्वप्नीलचा मृत्यू रॅगिंगमुळे(Death By Ragging) झाल्याचा धक्कादायक आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

    नाशिक : नाशिकच्या(Nashik) वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या (Vasantrao Pawar Medical College) हॉस्टेलमध्ये डॉ स्वप्नील शिंदे (Swapnil Shinde Death Case) या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. डॉ स्वप्नीलचा मृत्यू रॅगिंगमुळे(Death By Ragging) झाल्याचा धक्कादायक आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. दोषींवर पोलीस कारवाई करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका डॉ. स्वप्नीलच्या कुटुंबियांनी घेतली आहे.

    डॉ स्वप्नील शिंदे हा कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून २०१८ ला एमबीबीएस झाला.त्याने गोल्ड मेडल मिळवलं. पुढच्या शिक्षणासाठीही स्वप्नीलला सरकारी कोट्यातून मेरिटवर प्रवेश मिळाला होता.  नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत डॉ स्वप्नीलच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम करण्यात आलं. स्वप्नीलचा आतेभाऊ डॉक्टर असल्यानं हे पोस्टमार्टेम होत असताना तो आत होता. पोस्टमार्टेमच्या वेळी धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वप्नीलच्या छातीवर भयंकर आघात केल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे हा मृत्यू की घातपात ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

    सिनिअर असलेल्या २ डॉक्टर विद्यार्थिनींनी रॅगिंग केल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत. या दोघींच्या छळामुळे सहा महिन्यांपूर्वीही डॉ स्वप्नीलनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये विद्यार्थीनींनींचा उल्लेखही केला होता. मेडिकल कॉलेज प्रशासनानं त्यावेळी यावर बैठक घेऊन त्या मुलींना समजही दिली होती. दरम्यान स्वप्नील मानसिक रुग्ण असल्याचे डीन डॉ. मृणाल पाटील यांचे म्हणणे आहे.

    अमित देशमुखांनी दिले चौकशीचे आदेश

    एमडी गायनॅक या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीही डॉ स्वप्नीलला त्याच्या हुशारीनं, सरकारी कोट्यात प्रवेश मिळाला होता. त्याचं हे पहिलं वर्ष होत. या स्वप्नीलच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल आरोग्य मंत्रालयानं मागवला आहे. वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. देशमुख यांनी सांगितलं की, हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची अधिकृत माहिती आलेली नाही. पालकांचं म्हणणं एक आहे, महाविद्यालयाचं म्हणणं वेगळं आहे. सरकार या प्रकरणाची चौकशी करेल. मृत डॉक्टरांच्या पालकांशी संवाद साधू.