कोरोना कमी झाल्याने सटाणा शहर व तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करण्याच्या मागणीचा जोर वाढला

सटाणाचे माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेवतीने प्रशासनास निवेदन देत मागणी करण्यात आली. परंतु अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

    नाशिक: कोरोना करण्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून सटाणा शहरासह ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. यामुळे मात्र हजारो कुटुंबांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार भरविण्यासाठी परवानगी मिळावी,यासाठी आठवडे बाजार विक्रेता संघटनेच्या वतीने जोरदार मागणी केली जात आहे.

    सटाणा शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. यामुळे दुसरीकडे मात्र या आठवडे बाजारातच व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या हजारो जणांसमोर अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे. सटाणाचे माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेवतीने प्रशासनास निवेदन देत मागणी करण्यात आली. परंतु अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत सटाणा शहरातील छोट्या व्यावसायिकांकडून त्यांच्यावरील संकटाबाबत जाणून घेतलेय.