कोणाचं काय तर कोणाचं काय ? लाॅकडाऊनच्या भीतीने गाय छापची मागणी वाढली!

आता प्रशासनाने काही निर्बंध लादल्यानंतर गाय छाप शाैकिनांनी पूर्वानुभव पाहता आतापासूनच गाय छाप ‘स्टाॅक’ करायला सुरूवात केल्याने बाजारात गाय छापचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे गाय छापचा साठा आहे त्यांनी आतापासूनच भाववाढ सुरू केली असून, सध्या बाजारात १२ रुपयांना ही पुडी विक्री सुरू आहे.

    नाशिक : गेल्या वर्षी काेराेनामुळे केंद्र शासनाने देशभर लाॅकडाऊन जाहीर केला हाेता. या काळात तंबाखूच्या एका पुडीचे दर ७० रुपयांपर्यंत जाऊन पाेहाेचले आता आहे. आता शहर-जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊन हाेण्याची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच १० रुपयांची गायछाप १२ रुपयांना विकायला सुरूवात केली आहे. त्यामुळे गायछाप शाैकीनांना दाेन रुपयांची झळ साेसावी लागत आहे.

    काेराेेनाचा प्रादूर्भाव वाढत असताना रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून प्रशासनाने दंड वसुली सुरू केली हाेती. त्यानंतर अमली पदार्थ विक्री करण्यासही बंदी करण्यात आली हाेती. त्यामुळे लपून छपून गाय छाप विकत घ्यावी लागायची. त्यातही काही तुरळक व्यापाऱ्यांकडेच गाय छापचा साठा हाेता. त्यामुळे गाय छापला साेन्याचा भाव मिळत हाेेता. लाॅकडाऊनच्या काळात ४० रुपयांपासून तर ७० रुपयांपर्यंत गायछाप विक्री हाेत हाेती.