संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

आंबेडकर चौकात आमदार हिरामण खोसकर यांनी पालखीचे स्वागत केले. बस मध्ये पालखी ठेवताच ‘पुंडलिक वर दे’चा गजर करण्यात आला. प्रांताधिकारी तेजस चव्हाण ग्रामीण ग्रामीण पाेिलस अधीक्षक सचिन पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर पाेिलस बंदोबस्त होता.

    त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे सहा वाजून पंचवीस मिनिटांनी प्रस्थान झाले. पालखीला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वारकरी आणि भाविक उपस्थित होते. आषाढी एकादशी निमित्त संत निवृत्तीनाथ पालखी आज धो धो पावसात रवाना झाली. टाळ मृदंग गजरात शिवशाही बस पंढरपूर कडे रवाना झाल्या. सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी रद्द करून संत निवृत्ती नाथ पालखी शिवशाही बसने पंढरपूरला गेली.

    दरम्यान, आज पहाटे संत निवृत्तीनाथ मंदिरात पुजारी सचितानंद गोसावी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत निवृत्तीनाथ मंदिरापासून पायी दिंडीने पालखी कुशावर्तवर आली. येथे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक पूजा आरती केली. तेथून पायी त्रंबकेश्वर मंदिरासमोर येत टाळ मृदुंग गुजरात अभंग वाणी करण्यात आली. यावेळी वारकरी महिलांनी फुगड्या खेळल्या.

    आंबेडकर चौकात आमदार हिरामण खोसकर यांनी पालखीचे स्वागत केले. बस मध्ये पालखी ठेवताच ‘पुंडलिक वर दे’चा गजर करण्यात आला. प्रांताधिकारी तेजस चव्हाण ग्रामीण ग्रामीण पाेिलस अधीक्षक सचिन पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर पाेिलस बंदोबस्त होता. संत निवृत्तीनाथ मंदिराचे जयंत महाराज गोसावी म्हणाले की त्यांनी पंढरपूर पायी वारीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली होती. मात्र कोरोनाच्या संकट काळात ते शक्य नसल्याचे प्रशासनाने सांगितले.