तीस इंच पाऊस होऊनही लासलगावकर तहानलेलेच

लासलगाव शहर व परिसरामध्ये आत्तापर्यंत तीस इंच पाऊस होऊन देखील लासलगाव करांना (Despite 30 inches of rain ) भर पावसाळ्यामध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

लासलगाव : लासलगाव शहराला (Lasalgaon city ) पाणीपुरवठा करणारी सोळा गाव पाणीयोजना (Water planning) पुन्हा नादुरुस्त झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून लासलगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. लासलगाव शहर व परिसरामध्ये आत्तापर्यंत तीस इंच पाऊस होऊन देखील लासलगाव करांना (Despite 30 inches of rain ) भर पावसाळ्यामध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटणे ,मोटारी जळणे एक्सप्रेस फिडर असूनदेखील वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे या तिहेरी कारणांमुळे लासलगाव मधील नागरिक हतबल झाले आहे.

महिन्याला फक्त चार ते पाच वेळा पाणी पुरवठा होत आहे. हातावर पोट भरणारे तसेच नोकरदार वर्ग यांना ग्रामपंचायत कडुन होणाऱ्या पाणीपुरवठ्याची अचूक वेळ नसल्याने पाण्याची वाट पहात दिवसभर ताटकळत रहावे लागत आहे. प्रशासकाच्या ढिसाळ कारभारामुळे २५ हजाराहून जास्त लोकसंख्या असलेल्या लासलगाव करांना पावसाळ्यामध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या कृत्रिम पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे.

आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची कांद्याची बाजारपेठ, भाभा अनु.संशोधन केंद्र, एनएचआरडीएफ, नाफेड यासारख्या अनेक महत्वाच्या संस्थेमध्ये लासलगावसह जवळपासच्या गावातील नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने कृत्रिमरित्या असलेल्या पाणीटंचाईमुळे अनेक व्यावसायिक दुकानदारांना पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे.

लासलगाव पाणीटंचाई नित्याचीच झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही पाणी टंचाई बाबत गप्प का असा प्रश्न पडलेला आहे. सोळा गाव पाणीपुरवठा दुरुस्तीचे ठेका एखाद्या एजन्सीला दिले गेले पाहिजे यामुळे नियमित त्याची देखभाल होईल आणि या समस्येपासून सुटका होईल.

महेंद्र हांडगे, रहिवाशी लासलगाव

समस्त गावकऱ्यांना वेळेवर पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे मात्र १६ गाव पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यासाठी नुकतेच खासदार भारती पवार यांच्याशी चर्चा झाली आहे.

योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य

प्रशासनाला गांभीर्य नाही : 
पाणीपुरवठा विस्कळीतसाठी प्रशासक सुधाकर सोनवणे यांना अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ न शकल्याने यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाणीटंचाईबाबत माहिती दिली. त्यांनी प्रशासक सोनवणे यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात तुम्हाला प्रशासकाकडून माहिती देण्यात येईल, असे सांगितले. मात्र अद्यापही प्रशासक यांनी याबाबत कुठलीही माहिती दिली नसल्याने ऐन पावसाळ्यात लासलगाव पाणीटंचाईला सामोरे असतांना प्रशासकाला काहीच गांभीर्य दिसत नसल्याचे लक्षात येते.

सोळा गाव पाणी पुरवठा योजनेच्या पाणी पुरवठ्याचे खापर विजवितरण विभागावर फोडले जाते, पण वस्तूिस्थती तशी नाही. रानवड, नैताळे, नांदुरमध्यमेश्वर येथे तांत्रिक बिघाड झाला तर विजपुरवठा खंडीत होतो, यामुळे कमकुवत झालेली पाईपलाईन फुटते. प्रश्न विजपुरवठ्याचा नसून पाईपलाईनचा आहे.

सुरवसे साहेब, उपकार्यकारी अभियंता, विजवितरण विभाग, निफाड