आंदोलन काय असते, हे कोणीही मला शिकवू नये,आक्रमक व्हायला दोन मिनिटे लागतात; मराठा आक्षणाबाबत संभाजीराजे आक्रमक

भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाच्या भूमिकेला विरोध केल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा भाजपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारवेळा पत्र देवूनही भेटीसाठी वेळ दिली नाही. भाजपाने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा, अशी स्पष्ट भूमिका संभाजीराजेंनी घेतली आहे.

    नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाच्या भूमिकेला विरोध केल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा भाजपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारवेळा पत्र देवूनही भेटीसाठी वेळ दिली नाही. भाजपाने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा, अशी स्पष्ट भूमिका संभाजीराजेंनी घेतली आहे.

    आंदोलन काय असते, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटे लागतात. आंदोलनाला काय लागते, आता लगेच करू. पण त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज?

    माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मी 27 तारखेला माझी भूमिका मांडेन. एकदा मी पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. त्यावेळी मराठा आमदार आणि खासदारांनी माझे-तुझे केले तर बघा असा इशाराही त्यांनी दिला.