नियतीनेही त्यांचं अतूट प्रेम मान्य केलं! पतीच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच पत्नीचे निधन

पांडुरंग आहिरे व त्यांच्या पत्नी किसनाबाई यांनी दि. २४ मार्च रोजी आपली कोरोना चाचणी सटाणा येथे खाजगी रुग्णालयात करून घेतली व दि.२७ मार्च रोजी पती-पत्नीचे अहवाल पॉझिटिव्ह पाप्त झाले होते. त्यांनी सटाणा येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेतला असता प्रकृती स्थिर नसल्याने दि.२८ मार्च रोजी त्यांना नाशिक येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते.

    देवळा : पिंपळगाव वाखारी तालुका देवळा येथील पांडुरंग विट्टल आहिरे (वय ७२)वर्ष यांच्या निधनानंतर काही तासांतच , पत्नी किसनाबाई पांडुरंग आहिरे (वय ६६)वर्ष यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    या बाबत सविस्तर वृत्त असे की, पांडुरंग आहिरे व त्यांच्या पत्नी किसनाबाई यांनी दि. २४ मार्च रोजी आपली कोरोना चाचणी सटाणा येथे खाजगी रुग्णालयात करून घेतली व दि.२७ मार्च रोजी पती-पत्नीचे अहवाल पॉझिटिव्ह पाप्त झाले होते. त्यांनी सटाणा येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेतला असता प्रकृती स्थिर नसल्याने दि.२८ मार्च रोजी त्यांना नाशिक येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते. नाशिक येथील खाजगी रुग्णालयातुन उपचार घेऊन बरे होऊन ते घरी देखील परतले होते. मात्र बुधवार (दि. ७) रोजी पहाटे २:३० वाजेच्या सुमारास पांडुरंग आहेर यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीची तयारी चालू असतांनाच सकाळी ११:१५ वाजता पत्नी किसनाबाई आहेर यांचेही निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.