बंदी असतानाही धूळवड; पोलिसांकडून दंडूक्याचा चाेप

गोरक्षनाथ रोड परिसरात अनेक परप्रांतीय भाडेकरू म्हणून रहिवासी आहेत. आज धुलिवंदन असल्याने सर्वांनी करोनाच्या नियमांची पायमल्ली तुडवत सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले. कुणीही मास्क लावलेला नव्हता. तसेच जागोजागी आपल्या स्पिकर चे आवाज वाढवत ध्वनीप्रदुषण केले. पोलिसानी स्पिकर जमा करुन घेतले आहेत.

    सातपूर : काेराेनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने शहरात निर्बंध लादले आहेत. मात्र या निर्बंधांना ठेंगा दाखवून गोरक्षनाथ रोड परिसरात उत्तर भारतीयांचा धुलिवंदनच्या दिवशी रंग उडवीत नाचत असल्याचे समजल्याने पोलिसांना समजताच त्यांनी उतर भारतीयांना दंडुक्याचा चोप प्रसाद म्हणून दिला.

    या भागात गोरक्षनाथ रोड परिसरात उत्तर भारतीयांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. धुळवड हा सण त्यांच्यासाठी महत्त्वाचं सण मानला जातो. यामुळे काही जण नागरिकांनी घराच्या प्रांगणातच स्पीकर लावून नाचण्याचा आनंद घेताना दिसून आले. रंगांची उधळण करत उत्तर भारतीयांनी मद्याची व्यवस्थाही केली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

    याठिकाणी शासनाचे निर्देश धुडकावून धुळवड साजरी केली जात असल्याचे समजताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या परिसरात धाड टाकत रंग खेळणाऱ्या, स्पीकर लावणाऱ्या व मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी पोलिसांच्या धाकाने काही लोक घरात लपुन बसले तर काही जणांनी तेथून पळ काढला होता.

    गोरक्षनाथ रोड परिसरात अनेक परप्रांतीय भाडेकरू म्हणून रहिवासी आहेत. आज धुलिवंदन असल्याने सर्वांनी करोनाच्या नियमांची पायमल्ली तुडवत सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले. कुणीही मास्क लावलेला नव्हता. तसेच जागोजागी आपल्या स्पिकर चे आवाज वाढवत ध्वनीप्रदुषण केले. पोलिसानी स्पिकर जमा करुन घेतले आहेत.

    यामुळे यांना करोनाचे नियमपायदळी तुडवल्याचे या ठिकाणी दिसून आले. सातपूर पोलिसांनी या ठिकाणी अनेकांना मास्क न लावण्यावरुन दंडात्मक कारवाई केली.या सर्व कारवाईत मनपा प्रशासन कुठेही दिसून आले नाही.