दिंडोरी बंद! वणीत व्यवहार सुरळीत

डोरी येथे सोमवारी बहुतांशी व्यवहार थंडावलेले असतात प्रशासकीय कामकाज सुरु असते. मात्र आजच्या बंदमध्ये दिंडोरीकर सहभागी झाले तर वणीकरांनी आपले व्यवहार पूर्ववत सुरु ठेवले.

    दिंडोरी : उत्तर प्रदेश येथील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या भारत बंदच्या आव्हानास अनुसरुन दिंडोरी येथे बंद पाळण्यात आला; तर वणी येथे सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. विविध पक्षानी बंदमधे सहभागी होण्याचे आव्हान केले होते. दरम्यान, दिंडोरी येथे सोमवारी बहुतांशी व्यवहार थंडावलेले असतात, प्रशासकीय कामकाज सुरु असते. मात्र आजच्या बंदमध्ये दिंडोरीकर सहभागी झाले तर वणीकरांनी आपले व्यवहार पूर्ववत सुरु ठेवले.