Directly from the pitch of politics to the cricket field; Rohit Pawar's energetic batting

नाशिक : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राजकारणाच्या पीचवरुन थेट क्रिकेटच्या मैदानात आपली कामगिरी दाखवली. रोहित पवार यांनी दमदार बॅटींग करत सगळ्यांनाच अचंबित केले.

रोहित पवार हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ‘विहित क्रिकेट क्लब’ला भेट दिली. येथील खेळाडूंनी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा आग्रह रोहित पवार यांना केला.

यानंतर त्यांनी खेळाडूंच्या आग्रहाचा मान ठेवेत बॅट हातात घेतली. यावेळी दमदार बॅटींग करत त्यांनी आपल्या खिलाडी वृत्तीचे दर्शन दिले.
क्रिकेट खेळतानाचे फोटोही त्यांनी आपल्या ट्विटवर शेअर केले आहेत.

नाशिक शहरात ‘विहित क्रिकेट क्लब’च्या खेळाडूंनी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला. त्यांचा हा आग्रह आणि माझं क्रिकेट प्रेम या दोन्ही गोष्टींमुळं मला इथं बॅट हाती घ्यावी लागली. त्यांच्यासोबत थोडा वेळ क्रिकेट खेळलो असता मलाही आनंद वाटला असं ट्विटही त्यांनी केले.