मालेगाव, खारदांडा, पनवेल, आणि… भुजबळांच्या मालमत्तेची माहिती जाहीर करा; सोमय्यांचे शरद पवार, उद्धव ठाकरेंना आव्हान

मालेगाव, खारदांडा, पनवेल या ठिकाणी छगन भुजबळ यांची प्रचंड प्रमाणात बेनामी संपत्ती आहे. भुजबळ ज्या नऊ मजली इमारतीत राहतात, त्या इमारतीशी संबंध काय? तुम्ही तुमच्या परिवारासोबत ज्या महालात राहता, तो महाल उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा कुठून आला? कागदावर या नऊ मजली महालाचा मालक परवेझ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आहे. परवेझ कन्स्ट्रक्शनशी आपला संबंध काय? त्यांना तुम्ही भाडं देता की त्यांच्याकडून विकत घेतलं आहे?

    नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा सुरू होताच भाजपा नेते किरीट सोमय्या(kirit somaiya) ‘अॅक्टीव्ह’ झाले असून त्यांनी बुधवारी नाशिकचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ(chagan bhujbal) यांच्या मालमत्तांची पाहणी केली. सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळ यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई केल्याचा दावा केला होता.

    तथापि, भुजबळ यांनी दावा फेटाळला होता. त्यानंतर बुधवारी सोमय्या यांनी भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी भुजबळांच्या मालमत्तांची माहिती जाहीर करण्याचे थेट आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.