जिल्हा पाेलिसांची धडक माेहीम : सात लाखांच्या ट्रकसह २७ लाखांचा गुटखा जप्त

गुजरातमधून माेठ्या प्रमाणात अहवा मार्गे ताहराबाद गुटख्याची चोरटी वाहतूक होत आहे. अहमदाबाद–सूरत ते थेट मालेगाव व्हाया औरंगाबाद असे गुटखा माफीयांचे कनेक्शन आहे. दररोज या मार्गे लाखो रूपयांचा गुटख्याचा पुरवठा केला जात आहे. या गुटखा माफीयांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख यांनी विशेष पथक निर्माण करून धडक मोहीम हाती घेतली आहे.

  नाशिक : जिल्हा पोलिस प्रमुख सचिन पाटील यांनी आता गुटखा माफियांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सात लाखांच्या ट्रकसह २७ लाख ९८ हजार रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. ३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास जायखेडा नजीक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

  विशेष माेहीम सुरू
  गुजरातमधून माेठ्या प्रमाणात अहवा मार्गे ताहराबाद गुटख्याची चोरटी वाहतूक होत आहे. अहमदाबाद–सूरत ते थेट मालेगाव व्हाया औरंगाबाद असे गुटखा माफीयांचे कनेक्शन आहे. दररोज या मार्गे लाखो रूपयांचा गुटख्याचा पुरवठा केला जात आहे. या गुटखा माफीयांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख यांनी विशेष पथक निर्माण करून धडक मोहीम हाती घेतली आहे. या माेिहमेंतर्गत रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ताहराबाद ते नामपूर रस्त्यावरील जायखेडा गावाजवळ चार चाकी मालवाहू वाहन एमएच ४१ एयू १७१५ अडवून कारवाई करण्यात आली.

  गुजरातधून आणला गुटखा
  चालक किशोर वसंत ठाकरे (२५) रा . बिजोरसे, इजमाने रोड, मळगांव फाटा, मालेगांव याला पोलिसांनी अटक केली आहे. चालक ठाकरे याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर हा गुटखा व सुगंधित तंबाखू नामपूर येथील महेंद्र वसत अहिरे (पांडकर), रा. बाजारपेठ, नामपूर याचे मालकीचा असून हा गुजरातमधून नामपूरमध्ये विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले.

  मुद्देमाल हस्तगत
  ११,६६,८८०.०० विमल पान मसाला, २,०५, ९ २०.०० व्ही १ तंबाखू (२२ पाऊचवाले)चे एकूण ६ पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिकचे पोते, ६,५३,४००,०० विमल पान मसाल्याचे (११ पाऊच वाले)चे एकूण १५ खाकी रंगाचे सुती पोते, प्रत्येक पोत्यात १० छोटया प्लॅस्टिकच्या पांढन्या रंगाच्या गोण्या असलेले , प्रत्येक गोणीमध्ये २२ प्लॅस्टिकचे विमल पान मसाल्याचे १५४ ग्रॅमचे पुडे असलेले प्रति पुडयाची किंमत रु . १ ९ ८ प्रमाणे असलेले, ७२,६००.०० व्ही १ तंबाखू (११ पाऊच वाले)चे एकुण १५ निळया रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या, प्रत्येक गोणीत १० छोटया प्लॅस्टिकच्या निळ्या रंगाच्या गोण्या असलेले, प्रत्येक गोणीमध्ये २२ प्लॅस्टिकचे व्हि- १ तंबाखुचे प्लॅस्टिकचे पाऊच किंमतीची खाकी रंगाचे चारचाकी वाहन क्र. एमएच ४१ एयू १७१५ असा असलेली तिचे बॉडीस खाकी रंगाची कापडी ताडपत्री बांधलेली जु.वा. किं.अ. येणे प्रमाणे असे, ७,००,०००,०० असा एकूण २७,९८,८००,०० गुटखा पोलिसांनी जप्त केला.