MP Sambhaji Raje criticizes the state government if the Maratha reservation is affected

सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल समजून घेताे आहे. यात काय करता येईल, नक्की कुणाची काय जबाबदारी आहे. राज्यातल्या तज्ज्ञांशी याबाबत चर्चा करताे आहे. २७ तारखेला मुख्यमंत्री आणि विराेधी पक्षनेत्यांना भेटणार आहे. त्यांना भेटून समाजाच्या भावना पाेहाेचवणार, यावर काय मार्ग काढता येईल, याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते काय करतात, हे बघून पुढच्या आंदोलनाची भूमिका मुंबईत स्पष्ट करणार.

  नाशिक : मला आंदोलन शिकवण्याच्या भानगडीत कुणी पडू नये, आंदोलन काय असते आणि केव्हा करायचे, हे मला चांगले माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आता आराेप-प्रत्याराेप नकाेे तर यावर उपाय काय ते सूचवा, असे प्रतिपादन खासदार संभाजी राजे भाेेसले यांनी नाशिक येथे बाेलताना केले.

  टाेलवाटाेेलवी थांबवा
  सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पूर्वीची सत्तेत असलेले आणि आता सत्तेत असलेले एकमेकांवर आराेेप करत आहेत. आपली जबाबदारी झटकत आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहे. परंतु आता मराठा समाजाला याच्याशी काहीही देणेघेणे नाही. आता आम्हाला आरक्षणावर मार्ग सांगा.

  समंजस भूिमका याेग्यच
  सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मी समंजस भूिमका घेतली. त्यानंतर काहींनी यावर राजे खूप शांत आहेत, असे म्हंटले. मी २००७ सालापासून महाराष्ट्र पिंजून काढला. समाजाच्या भावना समजून घेतल्या, समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला कुणी आंदोलन शिकवू नका. २०१४ साली समाज माझ्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर आला हाेता. तेव्हा कुठे हाेते हे नेते? मराठी आज शांत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील आपली माणसे मरू नये म्हणून शह केलेला आहे. आज राज्यात काेेराेनाचे सावट आहे. आज काहीही आततायीपणा केला तर माणसं मरतील, ते याेग्य नाही. माणसं जगली तर आंदोलनही जगेल, हे लक्षात ठेवले पािहजे.

  याेग्य वेळी आक्रमक हाेणार
  सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल समजून घेताे आहे. यात काय करता येईल, नक्की कुणाची काय जबाबदारी आहे. राज्यातल्या तज्ज्ञांशी याबाबत चर्चा करताे आहे. २७ तारखेला मुख्यमंत्री आणि विराेधी पक्षनेत्यांना भेटणार आहे. त्यांना भेटून समाजाच्या भावना पाेहाेचवणार, यावर काय मार्ग काढता येईल, याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते काय करतात, हे बघून पुढच्या आंदोलनाची भूमिका मुंबईत स्पष्ट करणार.

  आमदार-खासदारांना इशारा
  २७ तारखेला मुंबईत मराठा अांदाेलनाची िदशा ठरवणार अाहे. त्यावेळी मात्र कुणी इकडे-तिकडे बाेट दाखवले तर महागात पडेल. अामदार-खासदारांना माझी अाजच िवनंती अाहे. २७ तारखेनंतर मराठा अारक्षणासाठी एकत्र यावे. त्यावेळे मागे हाेऊ नका. २७ तारखेपर्यंत समाजाने कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता शांत रहावे, अाजमितीला रस्त्यावर उतरणे जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे समाजबांधवांनी संयम राखावा, असे अावाहन त्यांनी मराठा समाजाला केले.

  दंगल झाली असती तर?
  २०१४ साली अाझाद मैदानावर अालेल्या माेर्चाला मी एकटा सामाेरा गेलाे. मी अावाहन केल्यामुळेच मराठा समाज मागे फिरला. त्यावेळी कुणाची िहंमत नव्हती, व्यासपीठावर जायची, अाज मला शिकवणारे नेते तेव्हा कुठे हाेते? त्याठिकाणी दंगल झाली असतील अािण समाजबांधवांच्या जीवाचे बरे-वाईट झाले असते तर कुणी जबाबदारी घेतली असती?

  आज आक्रमक हाेताे
  माझ्यावर संयम राखल्याचा आराेप याेग्य नाही. मी आज रस्त्यावर उतरताे. समाजही रस्त्यावर उतरेल, पण काेराेनाची परिसि्थती गंभीर आहे. रस्त्यावर उतरलाे आणि समाजबांधव काेराेनाचे बळी ठरले तर काय करणार? आज माणूस जगणे महत्त्वाचे आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

  ‘सारथी’चा खेळ मांडला
  शाहू महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या संस्थेची राज्य सरकारने वाट लावली आहे. तेथे एकही जाणकार माणूस नाही. दीड वर्षांत काय केले सारथीसाठी? जे राज्य शासनाच्या हातात आहे ते तरी करा, सुप्रीम काेर्टाच्या निर्णयाबाबत काय करायचे ते नंतर ठरवू.

  समाजाची दिशाभूल करू नका
  सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी सप्टेंबर २००९ च्या आधीच्या उमेदवारांना नियुक्त्या देता येतील, असे सांगितले आहे. त्यामुळे राज्य शासनाने या उमेदवारांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्वरित निर्णय घ्यावा. जे तुमच्या हातात आहे ते तरी करा. मराठा समाजाची सत्ताधारी आणि विराेधकांनी समाजाची दिशाभूल करू नये.

  आता पर्याय हवा!
  आजपर्यंत याचे-त्याचे नाव सांगणे पुरे झाले. आता यावर ठाेस पर्याय हवा. राज्य शासनाने २७ तारखेपर्यंत यावर अभ्यास करावा. नक्की कुणाची जबाबदारी हे शाेधावे. त्यानंतर मात्र आम्ही कुणाचेही काहीही ऐकणार नाही. आता आम्हाला आरक्षण कसे मिळणार? यावर उपाय हवा. अन्यथा मराठा समाजाची भूमिका काय असेल, हे २७ तारखेला जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.