drunk teacher

शिक्षकानं शाळेत बसूनच मद्यपान (Drunk Teacher Video) केल्याची घटना समोर आली आहे.दारु पिल्यामुळे संबंधित शिक्षकाला नीट बसताही येत नाही. त्यामुळे तो अर्धवट टेबलाखाली पडून बडबडत आहे.

    त्र्यंबकेश्वर:शाळा ही अशी जागा आहे जिथे विद्यादानाचं काम चालतं. शालेय वयात शिक्षकांनी (Teacher) केलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडत असतात, अशा या पवित्र स्थळाला एका शिक्षकानं काळिमा फासला आहे. शिक्षकानं शाळेत बसूनच मद्यपान (Drunk Teacher Video) केल्याची घटना समोर आली आहे.

    दारु पिल्यामुळे संबंधित शिक्षकाला नीट बसताही येत नाही. त्यामुळे तो अर्धवट टेबलाखाली पडून बडबडत आहे. गावातील काही तरुणांनी त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ(Viral Video Of Nashik`s Drunk Teacher) रेकॉर्ड केला आहे.

    हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून गावकऱ्यांनी शिक्षकाच्या या कृत्याचा निषेध केला आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरनजीक असणाऱ्या दापूरे गावातील आहे. संबंधित शिक्षक दापूरे गावातील ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकवण्याचं काम करतो. सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहे, अशात या शिक्षकानं शाळेलाच आपले दारुचा अड्डा बनवला आहे.

    संबंधित मद्यधुंद शिक्षकाला आपण कुठे आहोत ? काय करत आहोत ? याचं देखील भान उरलं नाही. गावातील काही नागरिकांनी संबंधित मद्यधुंद शिक्षकाची कानउघाडणी केली आहे.