उत्पादन कमी झाल्याने टोमॅटोला ‘भाव’, मालच शिल्लक नसल्याने शेतकऱ्याला फटका

आठ ते दहा महिन्यांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोना, लाॅकडाऊन, पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे अताेनात नुकसान झाले आहे. द्राक्ष हंगामात कोरोनाने भांडवलाची व उत्पन्नाची पुरती वाट लागल्यामुळे आता जवळ भांडवलही नाही. थोड्या फार प्रमाणात भांडवल जवळजवळ असतांना कोणते पीक घ्यावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोनामुळे भाजीपाल्याची रोपेही मिळत नव्हती. तेव्हा शेतकरीवर्गाने मागील हंगामात गेलेले भांडवल भरून काढण्यासाठी टाेमॅटाे पिकाला पसंती दिली. मोठ्या कष्टाने रोपे उपलब्ध करून टाेमॅटाेचे पीक तयार केले.

दिंडोरी : शेतकऱ्यांनी नगदी भांडवल मिळेल म्हणून टाेमॅटाेची (tomatoes ) लागवड केली हाेती; मात्र येथेही त्यांच्या नशिबी अपयशच आले. वातावरणातील बदलाचा (Weather Change) फटका बसल्याने एकरी उत्पादन घटले. टाेमॅटाेला आता बाजारात चांगला भाव (, tomatoes get ‘price’) असूनही मालच शिल्लक (Due to low production,) नसल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना घेता येत नाही.

आस्मानी आिण सुल्तानी संकटांचा सामना करणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना यावेळी टोमॅटोनेदेखील साथ दिली नाही. काही ठिकाणी अितवृष्टीने टोमॅटोचे नुकसान झाल्याने पीक कमी आले; तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे टाेमॅटाे संपल्यानंतर चांगला भाव  मिळू लागला आहे. द्राक्ष हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी टाेमॅटाेला माेठ्या प्रमाणात पसंती दिली हाेती.

आठ ते दहा महिन्यांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोना, लाॅकडाऊन, पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे अताेनात नुकसान झाले आहे. द्राक्ष हंगामात कोरोनाने भांडवलाची व उत्पन्नाची पुरती वाट लागल्यामुळे आता जवळ भांडवलही नाही. थोड्या फार प्रमाणात भांडवल जवळजवळ असतांना कोणते पीक घ्यावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोनामुळे भाजीपाल्याची रोपेही मिळत नव्हती. तेव्हा शेतकरीवर्गाने मागील हंगामात गेलेले भांडवल भरून काढण्यासाठी टाेमॅटाे पिकाला पसंती दिली. मोठ्या कष्टाने रोपे उपलब्ध करून टाेमॅटाेचे पीक तयार केले. परंतु अगोदरचा कालखंड सोडला तर आता शेतकरीवर्गाला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

या हंगामात तर वातावरणातील बदल, परतीच्या पावसाने केलेला कहर, अशा अनेक संकटाचा सामना बळीराजाला करावा लागला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्याने टाेमॅटाेचे जतन केले. अगोदर झाडांना फूल कळी चांगली लागली. परंतु वातावरणातील बदलाने या फूल कळीवर व झाडावर वेगवेगळ्या रोगांनी आक्रमण करून फळधारणा कमी झाली. तालुक्यातील पश्चमि पट्ट्यातील शेतातील टाेमॅटाे पावसाने भुईसपाट केले.

जे टाेमॅटाे रािहले त्यांनाही फळधारणा कमी प्रमाणात होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. अगाेदरच्या कालखंडात टाेमॅटाेचे एकरी सरासरी चांगले उत्पन्न मिळाले. परंतु आता वेळोवेळी होणारा वातावरणाचा फटका टाेमॅटाे पिकाला मोठ्या प्रमाणावर बसला. एकरी सरासरी शंभर ते दीडशे जाळी टाेमॅटाे निघायला पाहिजे. आता त्या ठिकाणी एकरी फक्त तीस जाळी टाेमॅटाे निघत आहे. त्यामुळे आता टाेमॅटाेची बाजारपेठ फुलली आणि टाेमॅटाेची कमतरता निर्माण होऊ लागल्याने शेतकरीवर्गाला परत एकदा डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. आता भाव चांगला तर टाेमॅटाे कमी प्रमाणात बाजारपेठेत येत नाही. वातावरणातील बदलाचा टाेमॅटाे पिकाला मोठा फटका बसल्याने त्याचा परिणाम फळधारणेवर झाला असून, एकरी सरासरी उत्पन्न कमी प्रमाणात येऊ लागल्याने आता याही पिकात शेतकरी वर्गाला निसर्गाने हात ठेकावयला लावले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.

शेतकरी वर्गाने मोठ्या मेहनतीने कष्ट करून खडतर परिसि्थतीत टाेमॅटाेचे पीक जगवले हाेते. कर्जाऊ रक्कम उभारून टाेमॅटाे लागवड, औषधे, फवारणी केली. मात्र उत्पन्नच कमी झाल्याने शेतकऱ्यांना भांडवलही वसूल करता आले नाही.

- अजित कड, शेतकरी, दहेगाव वागळूद