डीवायएफआयचे  आंदोलन : बॅंक ऑफ  बडाेदाच्या कारभाराचा निषेध

पूर्वी देना बँक होती. आता त्या बॅंकेचे वर्गीकरण बॅंक ऑफ बडोदामध्ये झाल्यामुळे साधारण एक वर्षापासून शे-दोनशे खातेदार सोडले तर उर्वरित एक लाख खातेदारांना अद्यापपर्यंत बॅंक पासबूक मिळाले नाही. पासबूकअभावी खातेदारांना खूप अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सरकरी नोकरवर्गाला त्यांचा पगार खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागते.

    सुरगाणा : नोटांबंदी पाठोपाठ देना बँकेचे रुपांतर बडोदा बॅंकेत झाल्याने सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. या भोंगळ कारभाराविषयी डीवायएफआय संघटनेतर्फे युवकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले. तालुक्यातील आदिवासी, शेतकरी, युवक, विद्यार्थी, व्यावसायिक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तालुक्यात देना बँक, बॅंक ऑफ बडोदा या सर्वात जुन्या बॅंक  शाखेमध्ये साधारण एक लाखाहून अधिक खातेदार आहेत. त्या खातेदारांमध्ये शिष्यवृत्ती घेणारे सर्व विद्यार्थी, वेतन घेणारे सर्व सरकारी नोकर वर्ग, शेतकरी, व्यापारी,वृध्दपकाळ पेन्शन घेणारे,बचत गट यांच्या खात्यांचा समावेश आहे.
    या आहेत समस्या
    पूर्वी देना बँक होती. आता त्या बॅंकेचे वर्गीकरण बॅंक ऑफ बडोदामध्ये झाल्यामुळे साधारण एक वर्षापासून शे-दोनशे खातेदार सोडले तर उर्वरित एक लाख खातेदारांना अद्यापपर्यंत बॅंक पासबूक मिळाले नाही. पासबूकअभावी खातेदारांना खूप अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सरकरी नोकरवर्गाला त्यांचा पगार खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागते. विद्यार्थांना त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी बॅंक पासबुक आवश्यक आहे. खातेदारांची गेल्या एक वर्षापासून सुरू असलेली पिळवणूक थांबवून संबंधित सर्व खातेदारांना एक महिन्याच्या आत बॅंक पासबूकवर फोटो लावून त्याच्यावर बॅंक मॅनेजर यांची सही शिक्का मारुन ते पासबूक खातेदारांना विनाविलंब िवतरित करण्यात यावे, यासाठी आज युवा क्रांतिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली बॅंक ऑफ बडोदा येथे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी विविध समस्यांचे निवेदन बॅंकेचे शाखाधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार उपस्थित होते.
    यांची उपस्थिती 
    येत्या एक महिन्याच्या आत सर्व खातेदारांना पासबुक उपलब्ध करून देण्यात येईल, असे लेखी आश्वासन शाखाधिकाऱ्यांनी यावेळी आदाेलकांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  या आंदोलनात पांडुरंग गायकवाड, सुभाष भोये, अशोक धूम, चंद्रकांत वाघेरे, कान्हा हिरे, शिवराम गावित, राहुल आहेर, देविदास हाडळ, नितीन गावित, मेनका पवार, रोहिणी वाघेरे, सविता गायकवाड,भारती चौधरी, नितीन पवार, सुनील जाधव, संतू पालवा, वसंत झिरवाळ, गुलाब खांडवी, गिरीष गायकवाड, मधुकर म्हसे, दानिएल गांगुर्डे, जगन गावीत, राहुल गावीत, लिलाधर चौधरी, अशोक भोये, हेमंत भुसारे, योगेश थोरात, संस्कार पगारीया, धर्मेंद्र पगारीया, सुरेश गवळी, मधुबाबा, राजू बाबा शेख, वसंत बागूल, चिंतामण गवळी, भास्कर जाधव, योगेश महाले, पांडुरंग गावीत, मोहन पवार, कृष्णा भोये आदी उपसि्थत हाेते.