मुंबईनंतर नाशिकला भूकंपाचा धक्का

मुंबईनंतर (Mumbai) आता नाशिकमध्ये (Nashik ) ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. मुंबईतील पालघर जिल्ह्यातील काही भागांत मागील दोन दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यानंतर आज बुधवारी पहाटे ४ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास नाशिकमध्ये भूकंप झाला आहे.

नाशिक : देशात कोरोना विषाणूचे संकट (Corona Virus) सर्वत्र पसरत आहे. त्याचसोबतच आता गेल्या काही दिवसांपासून राज्यात भूकंपाचे (Earthquake ) धक्के बसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईनंतर (Mumbai) आता नाशिकमध्ये (Nashik ) ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला आहे.

मुंबईतील पालघर जिल्ह्यातील काही भागांत मागील दोन दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यानंतर आज बुधवारी पहाटे ४ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास नाशिकमध्ये भूकंप झाला आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या (NCS) म्हणण्यानुसार, आज पहाटे नाशिकच्या ९३ किमी पश्चिमेस ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला. दरम्यान, काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास अंदमान आणि निकोबार बेटांवर पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार अंदमान आणि निकोबार बेटांमधील दिगलीपूरच्या पूर्व-दक्षिणपूर्व २० किलोमीटर अंतरावर झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४ मोजली गेली.

https://www.navarashtra.com/palghar-news-marathi/collector-visit-to-earthquake-affected-areas-28157/ हे देखील वाचा.