ईडी, सीबीआयच्या रडारवर कोण कोण?, चंद्रकात पाटील म्हणाले की…

ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे केंद्राच्या अखत्यारीत काम करते त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. मात्र रात्रीतून कुणालाही अटक होऊ शकते, असं खळबळजनक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांचीही चौकशी सुरू आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

    नाशिक : ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे केंद्राच्या अखत्यारीत काम करते त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. मात्र रात्रीतून कुणालाही अटक होऊ शकते, असं खळबळजनक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांचीही चौकशी सुरू आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

    दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनंतर आता एकच खळबळ उडाली आहे. रात्रीतून कुणाला अटक झाली तर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मी नाशिकमध्ये उपलब्ध आहे, असं सुचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. खूप जणांच्या चौकशा सुरू आहेत. त्यातील अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यासाठी काल कोणी तरी कोर्टात गेलतं. नितीन राऊत यांनाही कोर्टाने फटाकरलं आहे. संजय राठोड यांचाही एक मॅटर पेंडिग आहे. अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचीही चौकशी सुरू आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

    तसेचं, माझा नेमका रोख कुणाकडे नव्हता. तुम्हाला सोप जावं म्हणून नावांची यादी देत आहे. कुणालाही उघडं पाडायचं नाही. केवळ तुम्हाला सोपं पडावं म्हणून आताच नावं घेतली आहेत, असं पाटील म्हणाले. जरंडेश्वरच्या निमित्ताने सर्वच कारखान्यांची चौकशी करा म्हणालो होतो. अण्णा हजारे यांनीही आधीच चौकशीची मागणी केली आहे, असं सुचक वक्तव्य देखील त्यांनी केलंय. त्यामुळे आता खुद्द अजित पवार अडचणीत सापडतील का असा सवाल आता उपस्थित होत आहे.