शिक्षणाधिकारी वैशाली झनकरांना सशर्त जामीन; नाशिकमधील  शिक्षकांकडून आठ लाखांची लाच घेताना रंगेहात झाली होती अटक

न्यायालयाने अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी कोर्टात सध्या खटला सुरू आहे. वैशाली यांच्या वकिलांनी 14 ऑगस्टला देखील जामीन अर्ज केला होता. पण त्यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवण्यात आली होती. याशिवाय ठाणे एसीबीने अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निकाल दिला होता.

    नाशिक : आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांना न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयाने जामीनासाठी काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. या अटी-शर्तींनुसार आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांना दर सोमवारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात (एसीबी) चौकशीसाठी हजेरी लावावी लागणार आहे.

    न्यायालयाने अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी कोर्टात सध्या खटला सुरू आहे. वैशाली यांच्या वकिलांनी 14 ऑगस्टला देखील जामीन अर्ज केला होता. पण त्यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवण्यात आली होती. याशिवाय ठाणे एसीबीने अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निकाल दिला होता.

    शैक्षणिक संस्थाचालकांच्या शिक्षकांकडून ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर या फरार झाल्या होत्या. रात्री महिलेस अटक करता येत नाही यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. वीर-झनकर यांच्या नातलगांचे हमीपत्र घेत डॉ. वीर-झनकर यांना घरी सोडले होते. मात्र त्या पोलीस ठाणे तसेच न्यायालयात हजर झाल्या नव्हत्या.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]