एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलेय; गिरीश महाजन यांची संतप्त प्रतिक्रिया

जळगाव जिल्हयातील भाजपचे मागील काळातील दोन बलाढ्य नेते आणि मंत्री असलेल्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणावरून सध्या धुमशान सुरू झाले आहे. खडसे यानी गिरीश महाजन यांची वादग्रस्त क्लिप व्हायरल केली आहे.

    नाशिक :  जळगाव जिल्हयातील भाजपचे मागील काळातील दोन बलाढ्य नेते आणि मंत्री असलेल्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणावरून सध्या धुमशान सुरू झाले आहे. खडसे यानी गिरीश महाजन यांची वादग्रस्त क्लिप व्हायरल केली आहे.

    या कथित व्हायरल क्लिपमध्ये गिरीश महाजन यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. या क्लिपमध्ये जिल्ह्यातील पाण्याची समस्या मांडणाऱ्या जामनेरच्या ग्रामस्थासोबत खडसे यांचा संवाद व्हायरल झाला आहे त्यात ‘आमच्या गावात पाणी नाही’ अशी ग्रामस्थाची तक्रार ऐकल्यानंतर “पाणी नाही, तर तुझा आमदार कुठे मेला?”“पोरीचे फोन उचलतो तो फक्त” असे वादग्रस्त वक्तव्य खडसे यंनी केल्याचे ऐकायला येत आहे. खडसे यांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.

    त्यानंतर या प्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “ऑडिओ क्लिप ऐकली त्यात खडसेंचा दोष नाही. वाढते वय, अनेक आजार यामुळे खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे राष्ट्रवादीत जाऊन त्यांना आमदारकी नाही, त्यांच्या मुलीला लोकांनी नाकारले, त्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली आहे. असे त्यांनी म्हटले आहे.