मद्यधुंद अवस्थेत नागाशी ‘फाईट’ करणं पडले महागात ; तरुणाची प्रकृती अत्यवस्थ

मद्यधुंद अवस्थेत आपण काय करतो याचे अनेकांना भान राहत नाही. अशीच एक घटना घडली आहे ती निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे. मद्यपी मंगेश भाऊसाहेब गायकवाड या तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाग दिसताच त्याने नागाशी मस्ती सुरू केली.

    लासलगाव : निफाड तालुक्यातील नांदूरमध्येश्वर येथील तरुणांच्या अंगलट आल्याची घटना घडली आहे. चार वेळा नागाने चावा घेतल्याने या तरुणांची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर नाशिक येथे शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

    मद्यधुंद अवस्थेत आपण काय करतो याचे अनेकांना भान राहत नाही. अशीच एक घटना घडली आहे ती निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे. मद्यपी मंगेश भाऊसाहेब गायकवाड या तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाग दिसताच त्याने नागाशी मस्ती सुरू केली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याने कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. मंगेश याने अर्धनग्न अवस्थेत नागानशी मस्ती करत असताना नागानेे मंगेशला चार वेळा चावा घेतला. चावा घेतल्याच्या रागात मंगेशने नागाला हाताने ठेचून मारून टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंगेशला नागाने चार वेळा चावा घेतल्याने मंगेशची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला निफाड येथे प्राथमिक उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अद्यापही मंगेशची प्रकृतीही चिंताजनक असल्याने मंगेश हा मृत्यूशी झुंज देत आहे.