onion

केंद्र सरकारने (Central Government) कांदा निर्यातीवर बंदी आणली. तसेच या कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त (Farmers angry)  झाले आहेत. उमराणेमध्ये कांदा लिलाव बंद पाडण्यात आला आहे. तर मुंबई-आग्रा ( Mumbai-Agra highway blocked in nashik) महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला आहे.

नाशिक : केंद्र सरकारने (Central Government) कांदा निर्यातीवर बंदी आणली. तसेच या कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त (Farmers angry)  झाले आहेत. उमराणेमध्ये कांदा लिलाव बंद पाडण्यात आला आहे. तर मुंबई-आग्रा ( Mumbai-Agra highway blocked in nashik) महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला आहे. तसेच नाशिकमधील (Nashik) लासलगावातही कांदा लिलाव अद्याप बंद तर शिरुरमध्येही कांदा पडून आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या निर्णयानंतर कांदा लिलाव सुरू होण्याची शक्यता, वर्तवली जात आहे.

६०० वाहनातून आणलेला कांदा अद्यापही लिलावाच्या प्रतीक्षेत आहे. तर उमराणे येथे कांदा लिलाव बंद पाडला असून मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला तर उमराणा, सटाणा आणि नामपूर येत शेतकऱ्यांनी रास्तारोको सुरु केला असून कांदा निर्यातबंदीचे आंदोलन चिघळणार, असे दिसत आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. तीव्र संताप व्यक्त होत आहे.