Pimpalgaon Baswant: Pruned vineyards
पिंपळगाव बसवंत : छाटणी करण्यात आलेल्या द्राक्षबागा

पिंपळगाव बसवंत परिसरात सध्या द्राक्षबागा छाटणीला वेग आला आहे. टोमॅटो, मका, सोयाबीन ही पिके ऐन बहरात असताना ढगफुटीसदृश पावसाने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.

पिंपळगाव बसवंत : गेल्या काही दिवसांपासून पिंपळगाव बसवंत परिसरात पावसाने (heavy rain) चांगलाच धिंगाणा घातला आहे. परिणामी, द्राक्षबागा (grapes farm) वाचविण्यासोबतच टोमॅटो (Tomato), मका सोयाबीन ही पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers ) अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पिंपळगाव बसवंत परिसरात सध्या द्राक्षबागा छाटणीला वेग आला आहे. टोमॅटो, मका, सोयाबीन ही पिके ऐन बहरात असताना ढगफुटीसदृश पावसाने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गेल्या आठवड्यापासून या पावसाने मुक्काम ठोकल्याने शेतकरी ओल्या दुष्काळाचा सामना करीत आहे. सोमवारी दिंडोरी तालुक्यात झालेल्या पावसाने कादवा नदीला पूर आला.

कोरोना महामारीमुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यात ऐन द्राक्षबागा छाटणीच्या काळातच पावसाने मुक्काम ठोकल्याने मोठे नुकसान होऊ शकते.

- संतोष बस्ते, शेतकरी, कारसूळ

सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. मका, सोयाबीन पिकही धोक्यात आले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची गरज आहे.

- देवेंद्र काजळे, माजी उपसरपंच, कारसूळ