शेतकरी संघटना आक्रमक ; शिवसाई स्विटकाॅर्नकडून लाखोंचा गंडा

टाळेबंदीची सबब सांगत संबंधित कंपनीने चालढकल केली. टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल झाल्यावर मे महिन्यात मात्र कंपनी मालक फरार झाला असून, मोबाईल बंद केला आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अर्थिक कोंडीत सापडला असून व्याजाने कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसल्याची खंत शेतक-यांनी बोलून दाखवली. तरी शिवसाई कंपनी मालकावर कायदेशीर कारवाई करून शेतक-यांना स्विटकाॅर्न मकाचे पैसे मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  येवला : स्विटकाॅर्न मका उत्पादक शेतक-यांना स्विटकाॅर्न मक्यावर प्रक्रिया करणा-या विंचूर औद्योगिक वसाहतीतील शिवसाई कंपनीकडून लाखोचा गंडा घालण्यात अाल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी निफाड व तहसीलदार निफाड यांच्याकडे शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली. यावेळी शेतकरीही उपस्थित होते.

  जानेवारीपासून रक्कम थकली
  उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंध्र प्रदेशातील रेड्डी नामक व्यक्तीने विंचूर, सिन्नर येथे औद्योगिक वसाहतीत स्विटकाॅर्न मका, कांदा यावर प्रक्रिया करणारा शिवसाई नामक उद्योग सुरू केला. नासिक येथे कंपनीचे कार्यालय आहे. शेतकऱ्यांकडून मका खरेदी करून पंधरा, वीस दिवसांत स्विटकाॅर्न मकाचे पैसे द्यायचे हे डिसेंबर २०२० पर्यंत चालू होते; परंतु जानेवारी २०२१ पासून एप्रिलपर्यंत अंदाजे ४१ ते ४२ लाख रूपये शेतक-यांना मिळाले नाही.

  टाळेबंदीची सबब
  टाळेबंदीची सबब सांगत संबंधित कंपनीने चालढकल केली. टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल झाल्यावर मे महिन्यात मात्र कंपनी मालक फरार झाला असून, मोबाईल बंद केला आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अर्थिक कोंडीत सापडला असून व्याजाने कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसल्याची खंत शेतक-यांनी बोलून दाखवली. तरी शिवसाई कंपनी मालकावर कायदेशीर कारवाई करून शेतक-यांना स्विटकाॅर्न मकाचे पैसे मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  रास्ताराेकाेचा इशारा
  संबंधित कंपनीने एक आठवड्यात रक्कम न दिल्यास विंचूर औद्योगिक वसाहत समोर शेतकरी रास्तारोको आंदोलन करतील व होणाऱ्या परिणामास शिवसाई कंपनी मालक आणि पदाधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे बापूसाहेब पगारे, भानुदास चव्हाण, संकेत आहेर, साहेबराव लभडे, संदीप जगदाळे, सोमनाथ संभेराव, अनिता गांगुर्डे, वंदना चौधरी, योगेश कोकाटे, बाळासाहेब गायकवाड यांनी दिला आहे.