आर्थिक संकट : पाटोदा येथील शेतकऱ्याने चार द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड

सोमनाथ घोरपडे यांची पाटोदा येथे जमीन असून तीन वर्षांपूर्वी  द्राक्ष बागेची लागवड गेली होती. पण गेले तीन वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ तर कधी कोरोनाचे संकट यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या द्राक्ष बागेतून एक रुपयाचेही उत्पादन न निघाल्याने या शेतकऱ्यांनी चार एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे.

  येवला : कधी नैसर्गिक संकट कधी निर्यात धोरणाबाबत सरकारची अनास्था या कारणामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने द्राक्षाला भाव मिळत नाही. अस्मानी आणि सुलतानी संकटे यामध्ये अडकलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षी सुरुवातीला अतिवृष्टीने तर नंतर कोरोना संसर्गजन्य साथीच्या विळख्यात द्राक्षबागा सापडल्याने हजारो हेक्टरवरील द्राक्षबागेतून शेतकऱ्यांचा खर्चदेखील वसूल झालेला नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खर्च करूनही द्राक्ष बागेतून एक रुपयादेखील उत्पन्न न झाल्याने येवला तालुक्यातील पाटोदा येथील सोमनाथ भागवत घोरपडे या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांने आलेल्या संकटांना कंटाळून द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवली आहे.
  हाती काहीच लागले नाही
  सोमनाथ घोरपडे यांची पाटोदा येथे जमीन असून तीन वर्षांपूर्वी  द्राक्ष बागेची लागवड गेली होती. पण गेले तीन वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ तर कधी कोरोनाचे संकट यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या द्राक्ष बागेतून एक रुपयाचेही उत्पादन न निघाल्याने या शेतकऱ्यांनी चार एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. यावर्षी त्यांनी सप्टेंबरमध्ये द्राक्षाची छाटणी केली. द्राक्ष छाटणी केल्यानंतर १५ दिवस औषध फवारण्या खते अन‌् मजुरीचा मोठा खर्च झाला आहे. द्राक्ष पोंग्यामध्ये असतानाच सलग दोन तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात माल जिरुन गेला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करुनही हाती काहीच लागत नसल्याने या शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला.
  लाखाेंचा खर्च
  २०१७-१८ मध्ये कर्ज काढून द्राक्षबाग उभी केली. साधारणपणे झाडे, तार, अँगल, ग्राफ्टिंग मिळून बाग उभी करण्यासाठी ७ ते ८ लाखापर्यंत खर्च केला व नंतर दरवर्षी छाटणी, मजुरी, औषधांचा खर्च मिळून तीन वर्षात दहा बारा लाख रुपये झाला. पण बाग लावल्यापासून आजतागायत कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ अशी संकटावर संकटे आल्याने बागेतील एक रुपया देखील खर्च निघाला नसल्याने बागेवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कर्ज कसे फेडावे, अशी चिंता भेडसावत असून, सरकारने बागेचा पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

  द्राक्ष बाग छाटणी करून १५ दिवस झाले. या कालावधीत औषध फवारण्या, खते, मजुरी असा ४५ ते ५० खर्च झाला यावर्षी तरी चांगले उत्पन्न येईल, अशी अपेक्षा असताना दोन दिवस मुसळधार पाऊस झाला बागेत २४ तास पाणी राहिल्याने बागेचे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षीही बागेतून काही उत्पन्न हाती येईल असे वाटत नसल्याने बाग तोडण्याचा निर्णय घेतला.

  - सोमनाथ घोरपडे, पाटोदा