अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्यांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली.

    नाशिक : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्यांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली.

    माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा, असे ट्विट त्यांनी केले आहे.

    दरम्यान, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा लग्नसोहळा पुण्यात पार पडला. यावेळी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, संजय राऊत यांच्यासह छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावली होती.