सलग दुसऱ्या दिवशी लासलगावी कांदा वधारला

लासलगाव : देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांदा बाजार भावात दररोज वाढ होत आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलावात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सुरू होताच सहाशे रुपयांची प्रति क्विंटलमागे वाढ होत ७ हजार ८१२ रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे.

लासलगाव : देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांदा बाजार भावात दररोज वाढ होत आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलावात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सुरू होताच सहाशे रुपयांची प्रति क्विंटलमागे वाढ होत ७ हजार ८१२ रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. दररोज कांदा बाजारभावात वाढ होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

लासलगाव बाजार समिती ६९१ वाहनातून ७६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. या उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त ७८१२ रुपये, सरासरी ७१०० रुपये तर कमीतकमी १९०० रुपये इतका बाजार भाव मिळाला.

देशभरात उन्हाळ कांदा हंगामात कांद्याचे १३० टक्के उत्पादन झाले. मात्र यंदा पावसाचे राहिलेले जास्त दिवस मुक्काम आणि परतीच्या पावसाने नवीन लाल कांद्याची झालेली दैना यामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने मागणीच्या तुलनेत कांद्याचा देशांतर्गत पुरवठा होत नसल्याने कांद्याच्या बाजारभावात वाढ होताना दिसत आहे. आपल्याच परिसरातील कांदा आपल्या बाजार समित्यामध्ये विक्री झाला पाहिजे, यातून दोन पैसे हे आपल्याला मिळावे, यासाठी थोड्या चांगल्या कांद्याला उच्चांकी बाजार भाव दिला जात असल्याने राज्यात नवनवीन कांद्याचे विक्रम होताना दिसत आहे. त्यामुळे उच्चांकी बाजारभावावर माध्यमांनी लक्ष न देता सरासरी बाजारभाव काय मिळत आहे याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ जयदत्त होळकर यांनी सांगितले.