चार एकर कोथिंबिरीचा लिलाव साडेबारा लाखांना

शेतकरी नांदूरशिंगोटे हेमाडे यांनी ४ एकर क्षेत्रामध्ये ४५ किलो कोथिंबिरीचे बियाणे पेरले होते. तसेच पिकाच्या वाढीसाठी ४१ दिवस चांगली मेहनत घेतली. त्यामुळे दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांनी हेमाडे यांना कोथिंबिरीची मागणी केली आहे.

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील चार एकर कोथिंबिरीच्या पिकाला १२ लाख ५१ हजारांचे विक्रमी उत्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी नांदूरशिंगोटे हेमाडे यांनी ४ एकर क्षेत्रामध्ये ४५ किलो कोथिंबिरीचे बियाणे पेरले होते. तसेच पिकाच्या वाढीसाठी ४१ दिवस चांगली मेहनत घेतली. त्यामुळे दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांनी हेमाडे यांना कोथिंबिरीची मागणी केली आहे.

तसेच हा व्यवहार १२ लाख ५१ हजार रूपयांना निश्चित झाला आहे. शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळाल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. कुठल्याही प्रकारची पुढील बाजारभावाची अपेक्षा न करता शेतकरी हेमाडे यांनी स्वत:च्या हिमतीवर कोथिंबीर पिकाची लागवड केली होती. तसेच या कोथिंबिरीचा लिलाव हा साडेबारा लाखांना झाल्यामुळे त्यांना भरपूर आनंद झाला आहे.