नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या

नाशिक –  नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची अज्ञातांकडून गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची धक्कदायाक घटना समोर आली आहे. ही घटना नांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे घडली. परंतु एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या केल्यामुळे येथील परिसऱात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मृत व्यक्तींची नावे समाधान अण्णा चव्हाण (३७), भरताबाई चव्हाण (३२), मुलगा गणेश (६), मुलगी आरोही (४) अशी आहेत. समाधान हे आपल्या कुटुंबासमवेत मळ्यातील घरात राहत होते. समाधान हे एक रिक्षाचालक होते. परंतु लॉकडाऊनच्या काळात समाधान हे घरीच होते. तसेच त्यांची पत्नी भरताबाई मोलमजुरी करून आपले कुटुंब चावलत होती. मात्र काही अज्ञातांनी मिळून त्यांची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान आणि त्यांचे कुटुंब रात्री झोपले असतानाच काही अज्ञातांकडून या हत्येचा कट रचला गेला. त्यानंतर या चौघांची गळा चिरून हत्या केली. या गंभीर प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही हत्या कोणी केली, या हत्येच्या मागील नेमकं कारण काय, या संदर्भातील अनेक प्रश्न आणि माहिती अजूनही अस्पष्ट आहे. तसेच पोलीस आरोपींचा तपास करत आहेत.