fraud

कलंत्री यांनी सुपर फेब्रिक्स टेक्सटाईल्सचे आसिफ मसूद अतिक अहमद रा.म्हाळदे शिवार, ओवेस टेक्सटाईल्सचे नाहिदा कौसर मोहम्मद अझहर रा. सनाउल्लाह नगर तसेच ए.आर.टेक्सटाईल्सचे मोहम्मद अजहर हाजी रेहमतूल्लाह रा.सनाउल्लाह नगर मालेगाव यांना लूम साठी लागणारे सूत विक्री केले होते.

    मालेगाव : सूत मालाच्या खरेदी पोटी फिर्यादिस दिलेले प्रत्येकी ५० लाख प्रमाणे १ कोटी ५० लाख रकमेचे तीन धनादेश बँकेत न वटता परत आल्याने तीन जणांविरुद्ध शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्यात सुधीर गंगाभिसन कलंत्री (५६) रा.नेहरू चौक मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादी कलंत्री यांनी सुपर फेब्रिक्स टेक्सटाईल्सचे आसिफ मसूद अतिक अहमद रा.म्हाळदे शिवार, ओवेस टेक्सटाईल्सचे नाहिदा कौसर मोहम्मद अझहर रा. सनाउल्लाह नगर तसेच ए.आर.टेक्सटाईल्सचे मोहम्मद अजहर हाजी रेहमतूल्लाह रा.सनाउल्लाह नगर मालेगाव यांना लूम साठी लागणारे सूत विक्री केले होते. या सूत खरेदी पोटी वरील तिन्ही संशयितांनी फिर्यादी कलंत्री यांना प्रत्येकी ५० लाख याप्रमाणे १ कोटी ५० लाख रकमेचे तीन धनादेश दिले होते. मात्र वरील तिन्ही लूम कारखानदारांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आल्याने फिर्यादी कलंत्री यांनी शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहे.