Rape-on-Small-girl

या अल्पवयीन मुलीचं वय १३ वर्ष आहे. पीडित मुलीच्या आईला या घटनेची माहिती मिळताच, पीडितेच्या आईने नाशिकरोड पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik)  एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक (Gang Rape) बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना नाशिकरोड परिसरातील अरिंगळे ( Aringale) मळ्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीचं वय १३ वर्ष आहे. पीडित मुलीच्या आईला या घटनेची माहिती मिळताच, पीडितेच्या आईने नाशिकरोड पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात पोक्सो (POCSO Act) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, चाकूचा धाक दाखवून पीडितेवर अत्याचार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण घटनेमध्ये २ अल्पवयिन मुले आणि एका मुलीचाही समावेश आहे.