Gujarat connection of gutka smuggling in Maharashtra; The need for action at the state border

कर्करोग व तत्सम जीवघेण्या आजाराला आमंत्रण देणाऱ्या गुटख्याला महाराष्ट्रात प्रतिबंध असतानाही गुजरात राज्यातून येणाऱ्या गुटख्याची पाळेमुळे शोधणे गरजेचे आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात येणारा गुटखा गुजरात राज्यातील धरमपूर, पेठ व सापुतारा येथून वणीमार्गे येतो. यात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू याचाही समावेश असल्याचे यंत्रणेने वेळोवेळी उघड केले आहे. राज्य शासन तरुणाईला कर्कराेगापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच गुजरातच्या सीमेवरून हाेणारी ही गुटखा तस्करी निश्चितच आश्चर्यकारक आहे.

  वणी : कर्करोग व तत्सम जीवघेण्या आजाराला आमंत्रण देणाऱ्या गुटख्याला महाराष्ट्रात प्रतिबंध असतानाही गुजरात राज्यातून येणाऱ्या गुटख्याची पाळेमुळे शोधणे गरजेचे आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात येणारा गुटखा गुजरात राज्यातील धरमपूर, पेठ व सापुतारा येथून वणीमार्गे येतो. यात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू याचाही समावेश असल्याचे यंत्रणेने वेळोवेळी उघड केले आहे. राज्य शासन तरुणाईला कर्कराेगापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच गुजरातच्या सीमेवरून हाेणारी ही गुटखा तस्करी निश्चितच आश्चर्यकारक आहे.

  सखाेल चाैकशीची गरज

  गुटखा विक्री करण्याच्या इराद्याने विविध वाहनांमधून येणारा गुटखा व तत्सम प्रतिबंधित ऐवज पकडल्यानंतर हा ऐवज कोणत्या ठिकाणाहून वाहनात भरला व तो कोठे विक्रीसाठी घेऊन जात होता. याची सखोल चौकशी गरजेची आहे. कारण गुटखा ज्या ठिकाणी उत्पादीत होतो. तेथून वाहनात भरण्यात येतो. तसेच तो कोठे खाली करावयाचा हे गणित ठरलेले असते व गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला याची माहिती नाही यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.

  राजस्थानातूनही तस्करी

  दरम्यान, वणी पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी पकडलेला प्रतिबंधित ऐवज हा विविध खोक्यांमधे पॅकबंद अवस्थेत अाढळला हाेता. संशय येऊ नये, म्हणून परचुटन सािहत्याच्या पुढे हा ऐवज ठेवला होता. मात्र सपोनी स्वप्नील राजपूत यांनी दोन मोठे ट्रक पकडून धाडसी कारवाई केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी या ऐवजाच्या बिल्टी आहेत व हा माल राजस्थान येथे घेऊन जात असल्याची बाब तपासात पुढे आल्याने तपास यंत्रणाही चक्रावली होती.

  कारवाईत सातत्य हवे

  गुजरात -महाराष्ट्र व राजस्थान अशा तीन राज्यांच्या प्रवासातून वाहतूक करत असलेला प्रतिबंधित ऐवजाचा प्रवास तपासयंत्रणा व अन्न सुरक्षा विभाग यंत्रणांना कोड्यात टाकणारा होता. तसेच प्रतिबंधित ऐवजाची वाहतूक करण्यासाठी विविध शक्कल व अक्कल वापरण्यात येते काही वेळा दुसरा माल वाहनात असल्याचे भासवत राज्यस्तारीय वाहतूक करणारे कमी नाहीत. गुटखा तसेच प्रतिबंधित ऐवज पकडल्यानंतर वाहनचालकावर कारवाई होते तो ऐवज जप्त केला जातो संशयिताला अटक करण्यात येते.मात्र गुटखा व प्रतिबंधित ऐवज उत्पादीत करणारे व तो माल विकत घेणारे यांना सहआरोपी करणे गरजेचे आहे. दिंडोरी पोलिसांनी सध्या केलेल्या कारवाईत गुजरात राज्यातील बलसाड येथील घटकांवर कारवाई केली आहेे मात्र यात सातत्य हवे.

  कठाेर कारवाई हवी

  काही वेळा वाहनचालक सांगतात आत काय आहे याची माहिती नव्हती; मात्र कोणाच्या सांगण्यावरून मालाची वाहतूक होते हेही पुढे यायला हवे. वनविभागाचा ऐवज (लाकडे) जर बेकायदेशीर वाहतुकीत पकडली गेली तर वर्षानुवर्षे ती वाहने वनविभागाकडे जप्तीच्या स्वरुपात जमा करण्यात येतात. अशाच प्रकारची कारवाई करता येऊ शकते का? याची चाचपणीही प्रशासनाने करणे गरजेचे आहे.

  एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

  - संजय राऊत, खासदार, शिवसेना