नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर : दिवसभरात १३३० रुग्णांची वाढ

मालेगावतील १३८ रुग्णांचा समावेश

     

    मालेगाव : नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. काल बुधवार दि. १० मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात एकुण १३३०  नविन रूग्णांची वाढ झाली असून यात मालेगांव शहरातील १३८ नविन रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

    नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सायंकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत लॉक डाउन घोषित केला आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक असून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील वारंवार करण्यात येत आहे.

    काल वाढलेल्या नविन रूग्णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रात ७६८ ग्रामीण भागात ३८७ तर जिल्हाबाह्य ३७ नविन रूग्णांची वाढ झाली आहे. तसेच दिवसभरात ६ रूग्णांचा मृत्यु झाला असून यात नाशिक महापालिका क्षेत्रात १ तर ग्रामीणमधील ३ तसेच जिल्हाबाह्य २ रूग्णांचा समावेश आहे. काल दिवसभरात ५४९ रूग्ण पुर्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.