हृदयद्रावक ! वडिलांपाठाेपाठ घेतला अखेरचा श्वास ; जिल्हा शूटर्स असोसिएशनच्या सरचिटणीस मोनाली गोरे यांचे निधन

नाशिकला ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे भीष्मराज बाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. मात्र , मात्र त्यांच्या जाण्याने हे स्वप्न अर्धवट राहिले आहे. नाशिक जिल्हा शूटरस असोसिएशनच्या अध्यक्ष शर्वरी लथ यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस पदावर त्या कार्यरत होत्या.

    नाशिक : जिल्हा शूटर्स असोसिएशनच्या सरचिटणीस मोनाली गोरे यांचे अाज अल्पशा आजाराने निधन झाले. भारतीय युवा नेमबाजसाठी त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झालेली होती. भारतासह श्रीलंकेच्या ही नेमबाजांना त्या प्रशिक्षण देत होत्या. क्रीडा मानसोपचार तज्ञ स्व. भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हा शूटर्स असोसिएशनचे काम सुरु केले होते.

    नाशिकला ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे भीष्मराज बाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. मात्र , मात्र त्यांच्या जाण्याने हे स्वप्न अर्धवट राहिले आहे. नाशिक जिल्हा शूटरस असोसिएशनच्या अध्यक्ष शर्वरी लथ यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस पदावर त्या कार्यरत होत्या.

    काल रात्रीच माेनालीचे वडील मनोहर (बापू) गोऱ्हे यांचेही िनधन झाले. ते इंदिरानगर जिल्हा परिषद कॉलॉनीतील रहिवासी श्री दत्तगुरु सेवा संस्थानचे उपाध्यक्ष, संस्थानचे आधारस्तंभ, खंदे सामाजिक कार्यकर्ते हाेते.