लासलगाव परिसरात मुसळधार : व्यापाऱ्यांचा कांदा भिजला; पिकांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचले होते अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे दुकानदारांचे नुकसान झाले. लासलगाव पोलीस स्टेशनच्या आवारातही पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून लिलावत खरेदी केलेला कांदा हा ओला असल्याने सुकविण्यासाठी उघड्यावर व्यापार्याने ठेवला असता अचानक आलेल्या या पावसामुळे संपूर्ण कांदा ओला झाला आहे.

    लासलगाव : गेल्या दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर लासलगाव परिसरात पावसाची एक तासाहुन अधिक वेळ जोरदार बॅटिंग झाली. ढगांच्या आवाजासह, विजेचा कडकडाटात पावसाने पुन्हा लासलगाव व परिसराला झोडल्याने पुन्हा पाणीच पाणी साचले.यादरम्यान ५० मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद लासलगाव बाजार समितीच्या केंद्रावर झाली. जोरदार पावसानेबशेतकरी वर्गाचे तसेच व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा मोठ्या प्रमाणात भीजल्याने मोठे नुकसान झालेले आहे.

    द्राक्ष उत्पादक धास्तावले
    लासलगाव जवळील ब्राम्हणगांव विंचूर येथे शुक्रवार सकाळी सहा वाजता परतीच्या पावसाने ब्राम्हणगांव पूर्व व उत्तर भाग अक्षरक्ष: झोडपून काढलाय यात केदू न्याहरकर यांचे चार किलोचे लाल कांद्याचे बी व बाळासाहेब गवळी,यांचे चौदा किलो ऊन्हाळ कांद्याचे बी,सुनील गवळी,यांचे सहा किलो उन्हाळ कांद्याचे बी या पावसाने वाहून गेले असून इतर शेतकऱ्यांचे सोयाबीन, मका पिकाचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे येथील द्राक्षे उत्पादक शेतकरी ह्या परतीच्या पावसामुळे अडचणीत आला आहे छाटण्या झालेल्या बागेतील घडांची कुझ होने, झाडांच्या मुळ्या चोकप होणे, अशा वातावरणामुळे डाउन्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने औषध फवारणी खर्चात वाढ होईल या चितेंने द्राक्षे उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

    बळीराजा हवालदिल
    मुसळधार पावसामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचले होते अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे दुकानदारांचे नुकसान झाले. लासलगाव पोलीस स्टेशनच्या आवारातही पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून लिलावत खरेदी केलेला कांदा हा ओला असल्याने सुकविण्यासाठी उघड्यावर व्यापार्याने ठेवला असता अचानक आलेल्या या पावसामुळे संपूर्ण कांदा ओला झाला आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले तर गेल्या आठवड्यात गुलाबी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या मुसळधार पावसातून वाचलेले शेती पिके शुक्रवारीच्या मुसळधार पावसामुळे वाया जाणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या अनेक शेतांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे तळ्यांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे संपूर्ण शेती पिके खराब होण्याच्या मार्गावर असल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे असा मोठा प्रश्न बळीराजा समोर उभा ठाकला आहे.