नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

नाशिक : नाशिक शहर(nashik city) परिसरात दुपारी १ वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस(heavy rain) सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. नाशिक शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण हाेते. दुपारी १ वाजेपासून मात्र मुसळधार पावसाला सुरूवात झाली.

विजांच्या कडकडाटासह हाेत असलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. रस्त्यावरून वाहन चालवताना रस्ता दिसत नाही, इतका मुसळधार पाऊस नाशिक शहर व परिसरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बेमाेसमीने जिल्ह्याला झाेडपले आहे. शेतकऱ्यांच्या यापूर्वी झालेल्या नुकसानीचे अजून पंचनामे झालेले नाहीत; त्यातच आता पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. या पावसामुळे शेतात असलेले उरलेसुरले पीकही वाया जाण्याच्या शक्यतेने बळीराजा चिंतेत आहे.