नाशिकरोड परिसरात मुसळधार पाऊस

मुसळधार पाऊस असल्याने नाशिकरोडच्या रस्त्यावरून पाणी वाहून लागले तर पुर्व भागातील शेतात मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अचानक पाऊसाने हजेरी नागरिकांचे हाल झाले. पाऊसामुळे काही तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

    नाशिकरोड : परिसरात मंगळवारी दुपारपासून िवजेच्या कडकडाटासह  मुसळधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर व शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

    काल सकाळपासूनच शहरात पावसाचे वातावरण हाेते. दुपारच्या सुमारास नाशिकराेडसह परिसरात जाेरदार पाऊस झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. नाशिकरोडसह जेलरोड, उपनगर, देवळाली कम्प, भगूर, लहवित, नानेगाव, वडनेर दुमाला ,चेहेडी बु।। चाडेगाव, सिन्नर फाटा, कोटमगाव, सामनगाव, एकलहरे, शिंदे, पळसे, चांदगिरी आदी  परिसरात  सकाळपासून गरमी ने नागरिक हैराण झाले होते. तसेच ऊन्हाचा तडाखा लागत होता.  मंगळवारी  दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला. तसेच वारा सुटला आणि पाऊस सुरुवात झाली. मुसळधार पाऊस असल्याने नाशिकरोडच्या रस्त्यावरून पाणी वाहून लागले तर पुर्व भागातील शेतात मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अचानक पाऊसाने हजेरी नागरिकांचे हाल झाले. पाऊसामुळे काही तास वीजपुरवठा खंडित झाला होता.