सामनाच्या अग्रलेखाचे शहरात हाेर्डिंग, शिवसेना विरूद्ध भाजपा पाेस्टर वाॅर

कालच्या प्रकरणातील संशयितांचा पाेिलस शाेध घेत असतानाच आता हे नवीन प्रकरण सुरू झाल्याने पाेिलसांचीही डाेकेदुखी वाढली आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या घराकडे जाणाऱ्या चाैकात शिवसेनेचे नेते अजय बाेरस्ते यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखाचे माेठे हाेर्डिंग लावले आहेत. पाेिलसांनी हे हाेर्डिंग काढण्याबाबत सूचना केली असता नाशिककरांना समजू द्या नारायण राणे काेण आहे ते? असे म्हणत त्यांनी हाेर्डिंग काढण्यास नकार दिला.

    नाशिक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर काल राज्यात गोंधळ उडाला होता. पोलिस आयुक्तांनी राणेंच्या अटकेचे आदेश दिले आणि या वादाला सुरूवात झाली. काल शिवसैनकांनी भाजपा कार्यालयाची ताेडफाेड करून राणेंच्याविराेधात आंदाेलन केले हाेते. त्याचाच पुढचा भाग आज सकाळपासून सुरू झाला आहे. आजच्या सामनात छापण्यात आलेल्या अग्रलेखाचे हाेर्डिंग शहर परिसरात लावण्यात आल्याने नवा वाद सुरू हाेण्याची चिन्हे आहेत.

    कालच्या प्रकरणातील संशयितांचा पोलीस शाेध घेत असतानाच आता हे नवीन प्रकरण सुरू झाल्याने पाेिलसांचीही डाेकेदुखी वाढली आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या घराकडे जाणाऱ्या चाैकात शिवसेनेचे नेते अजय बाेरस्ते यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखाचे माेठे हाेर्डिंग लावले आहेत. पाेिलसांनी हे हाेर्डिंग काढण्याबाबत सूचना केली असता नाशिककरांना समजू द्या नारायण राणे काेण आहे ते? असे म्हणत त्यांनी हाेर्डिंग काढण्यास नकार दिला.

    यानंतर सर्वांच्याच नजरा खिळून होत्या त्या आजच्या सामनाच्या अग्रलेखाकडे. आज सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आणि त्याच्याही बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. यानंतर अनेक टीका टिपण्णीदेखील झाली. हे सर्वकाही सुरु असतानाच या अग्रलेखाचे पोस्टर चक्क नाशिक मध्यच्या भाजप आमदार आमदार देवयानी फरांदे यांच्या घराकडे जाणाऱ्या चौकात शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी लावल्यामुळे हा वादाचा विषय होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.