विखे-पाटलांना आताच पुळका कसा? ; तुषार जगताप यांची बाेचरी टीका

पन्नास टक्के मर्यादेच्या चौकटीने मराठा समाजाच्या आरक्षणाची कोंडी झाली आहे. कुणी कितीही विद्वत्ता पाझरली तरी ही मर्यादेची चौकट मोडल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणे शक्य नाही. पन्नास टक्क्यांत आम्हाला समाविष्ट व्हायचे असेल तर ओबीसीत समावेश करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र कुणाच्या ताटातले ओढून पाेट भरण्याची मराठ्यांची वृत्ती नाही.

    नाशिक : विखे -पाटील कसलेले राजकारणी आहेत. त्यामुळे ते समाजाला संभ्रमात टाकण्याची भूमिका पक्षाच्यवतीने वठवत आहेत. गेली ३५-४० वर्षे राजकारणात असताना त्यांनी समाजाच्या कुठल्या प्रश्नांना वाचा फाेडली, कुठले प्रश्न साेडवले. त्यांना मराठा आरक्षणाचा पुळका आजच कसा आला? असा सवाल मराठा क्रांती माेर्चाचे राज्य समन्वयक तुषार जगताप यांनी केला. केवळ सर्व संघटनांनी एकत्र यावे, सामूदाियक नेतृत्त्व तयार करण्यास वेळ मिळावा म्हणूनच काेल्हापूरचा माेर्चा पुढे ढकलावा, अशी खाेडसाळ मागणी विखेंकडून केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

    आधी आराखडा द्या
    सकल मराठा समाज छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्त्वाखाली लढाई लढण्यास तयार असताना राधाकृष्ण विखे-पाटलांच्या बैठकांमुळे समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम विखे-पाटील करीत आहे. भाजपाला जर खऱ्या अर्थाने समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी आधी आरक्षणासाठी काय करणार? आरक्षण कसे मिळवून देणार? याचा आराखडा समाजासमाेर मांडावा. केवळ राजकारण करण्यासाठी मराठा आरक्षणाचा विषय चिघळवू नये, असे त्यांनी म्हटले आहे. विखे-पाटील अशी मागणी करून नक्की काय साध्य करू इिच्छतात, हा संशाेधनाचा विषय आहे. केवळ छत्रपती संभाजी राजेंचे नेतृत्त्व मान्य नाही म्हणून ही पळवाट विखे-पाटलांकडून शाेधली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    कुणाच्या ताटातलं आम्हाला नकाे
    पन्नास टक्के मर्यादेच्या चौकटीने मराठा समाजाच्या आरक्षणाची कोंडी झाली आहे. कुणी कितीही विद्वत्ता पाझरली तरी ही मर्यादेची चौकट मोडल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणे शक्य नाही. पन्नास टक्क्यांत आम्हाला समाविष्ट व्हायचे असेल तर ओबीसीत समावेश करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र कुणाच्या ताटातले ओढून पाेट भरण्याची मराठ्यांची वृत्ती नाही. किंबहूूना ओबीसी मतांची चटक लागलेले हे पक्ष तसा निर्णय घेणारही नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने कायदा केला तरच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. केंद्रात भाजपाची सत्ता आहे त्यामुळे भाजपा नेत्यांनी केंद्राकडून कायदा करून घ्यावा आणि आपण खराेखर मराठा समाजाचे कैवारी आहाेत, हे सिद्ध करावे, असेही त्यांनी सांगितले.