उत्पादन खर्च कसा निघणार; लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल

कोरोनाची विषाणूचां वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी १२ ते २३ मे पर्यंत कडक लाँकडाऊन केले आहे. यामध्ये गर्दी होणारे ठिकाण म्हणजे बाजारसमित्याही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शेतकऱ्यांचा माल विक्री कसा करायचा याबाबत ठोस निर्णय दिला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.याबाबत बाजारसमिती प्रशासनाला देखील मार्गदर्शन नसल्याने ते देखील गोंधळात सापडले आहे.

    म्हसरूळ : कोरोनाची विषाणूचां वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी १२ ते २३ मे पर्यंत कडक लाँकडाऊन केले आहे. यामध्ये गर्दी होणारे ठिकाण म्हणजे बाजारसमित्याही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शेतकऱ्यांचा माल विक्री कसा करायचा याबाबत ठोस निर्णय दिला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.याबाबत बाजारसमिती प्रशासनाला देखील मार्गदर्शन नसल्याने ते देखील गोंधळात सापडले आहे.

    नाशिक जिल्ह्यात एकुण १६ बाजारसमिती असुन प्रत्येक ठिकाणी विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येत असतो. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये पालेभाज्या,सर्व प्रकारच्या फळभज्या, कांदा, आंबा, लसुन, बटाटा, डाळिंब देखील मोठ्या प्रमाणात विक्रीला येतो. बाजारसमितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांची, व्यापारी, हमाल, मापारी यांची गर्दी होत असते. पंरतू संपुर्ण शेतमाल हा नाशवंत असल्याने त्याची विल्हेवाट कशी लावायची हे संकट रुपी प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

    पहिलेच अस्मानी संकटांनी शेतकऱ्यास घेरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश हा संद्धिग्नपणे असल्याने एकीकडे बाजारसमिती बंद ठेवण्याचे आदेश तर त्याच आदेशात शेतमाल विक्रीसाठी विकेंद्रित पध्दतीचा अवलंब करावा असे सांगण्यात आले आहे. यावर जिल्हा उपनिंबधक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातुन मुंबई, सुरत, बडोदा, पालघर, वाशी, ठाणे येथे शेतमाल मोठ्या प्रमाणात विक्रीला पाठविण्यात येतो. पंरतू बाजारसमिती बंद असल्यावर या शहरामध्ये माल कसा पाठविण्यात येईल हा प्रश्न व्यापारी वर्गा समोर पडला आहे.

    बाजारसमिती बंद ठेवणे ही बाब अवघड आहे. नाशिक बाजारसमितीमध्ये दररोज चारचाकी वाहनातुन भाजीपाला, फळभाज्या,कांदा येत असतो.त्याचा आवाका देखील मोठ्या प्रमाणात असतो. तो कसा विक्री करणार, तसेच आलेल्या शेतकऱ्यांना काय उत्तर देणार.फक्त एकट्या नाशिक शहरात किती ठिकाणी भाजीपाला विक्री करणार हा प्रश्न अनुत्तरीत असून अवघड बाब आहे. त्यामुळे बाजारसमितीबाबत निर्णय घेण्यापुर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समिती सभापती व संचालक मंडळ व संलग्न असलेली प्रशासकीय यंत्रणा यांच्या समवेत चर्चा करण्याची गरज होती.

    - देविदास पिंगळे, सभापती नाशिक बाजारसमिती