शेकडाेे हेक्टरचे नुकसान माथेफिरूने पेटवले वनक्षेत्र

किकवारी,दसाने, नरकोळ येथील मोंड्या, जाळ्या, मडक्या, काकरीणीनीमाळ, रोहा, वागदारा येथील हजारो हेक्टर जंगलात मोठ्या प्रमाणात साग, सालय, सीताफळ, हेकळ, अमोनी, पळस, वड, पिंपळ, आंबा, चिंच, बांबू, पळस इत्यादी नैसर्गिक अधिवास असलेले मोठ्या प्रमाणात वनसंपदा होती. तसेच जंगल अधिक असल्याने व शेजारी गुजरातराज्य मुळे या भागात असंख्य प्रकारचे वन्य प्राणी, पशुपक्षी वास्तव्यास होते. आगीत बिबट्या, तरस, वानर, कोल्हे, सरपटणारे प्राणी, मोर, पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की तीस तासापेक्षा अधिक वेळ होऊनही (दि.१५) सायंकाळपर्यंत अद्याप आग विझवण्यात यश आले नव्हते.

  सटाणा : बागलाणमधील किकवारी, दसाणे व नरकोळ परिसरातील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूंनी आग लावल्याने शेकडो हेक्टरवरील वनसंपदा व वन्यजीव यांची हानी झाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती ताहाराबाद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश कांबळे व सटाणा येथील प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी दिली आहे.

  किकवारी,दसाने, नरकोळ येथील मोंड्या, जाळ्या, मडक्या, काकरीणीनीमाळ, रोहा, वागदारा येथील हजारो हेक्टर जंगलात मोठ्या प्रमाणात साग, सालय, सीताफळ, हेकळ, अमोनी, पळस, वड, पिंपळ, आंबा, चिंच, बांबू, पळस इत्यादी नैसर्गिक अधिवास असलेले मोठ्या प्रमाणात वनसंपदा होती. तसेच जंगल अधिक असल्याने व शेजारी गुजरातराज्य मुळे या भागात असंख्य प्रकारचे वन्य प्राणी, पशुपक्षी वास्तव्यास होते. आगीत बिबट्या, तरस, वानर, कोल्हे, सरपटणारे प्राणी, मोर, पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की तीस तासापेक्षा अधिक वेळ होऊनही (दि.१५) सायंकाळपर्यंत अद्याप आग विझवण्यात यश आले नव्हते.

  वनपरिक्षेत्र अधिकारी हिरे म्हणाले की माझ्या कर्मचाऱ्यांसह यशवंतनगर येथील ३० ते ४० मजूर प्रत्यक्ष ठिकाणी आग विझविण्याचा प्रयत्न करीत असून लवकरच तपास करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगण्यात आले.

  दसाणे येथील शेतकरी सिताराम सोनवणे यांनी सांगितले की आगीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्या ठिकाणचे कधीही भरून न निघणारे वनसंपदेचे नुकसान झाले आहे. तसेच रविवारी (दि.१४ ) सायंकाळी दसाणे येथील दादू सोनवणे ही व्यक्ती मोटर सायकल वर जात असताना रस्त्याच्या कडेला कुंपणात एक वाघीण व दोन बछडे होते. पैकी वाघिणीने सोनवणे याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता आजूबाजूच्या नागरिकांनी आवाज दिल्याने त्याचा जीव वाचला.

  बागलाण तालुक्यात काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात जंगल आहे अशा जंगल- डोंगरांना संबंधित विभागाने कंपाउंड करून व वनविभाग कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तरच येथील वनसंपदा वन्यजीव त्यांचे रक्षण होऊन पर्यावरणाचा समतोल राहण्यास मदत होणार आहे.

  - बिंदू शेठ शर्मा